Gurumauli Annasaheb More : श्री स्वामी सेवामार्गाने बुवाबाजी आणि अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही. ‘जय जवान- जय किसान आणि जय विज्ञान’ हा सेवामार्गाचा नारा आहे. त्यामुळे सेवेकऱ्यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून सेवाकार्य करावे, असे आवाहन सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी केले.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरुपीठात शनिवारी (ता. १६) साप्ताहिक सत्संग पार पडला. एकदिवसीय श्रीमद् गुरुचरित्र पारायणही घेण्यात आले. राज्यभरातून मोठ्या संख्येने सेवेकरी आले होते. सेवेकऱ्यांना संबोधित करताना गुरुमाउली म्हणाले, की सेवेकऱ्यांनी सर्वप्रथम सेवामार्गाचे अभ्यासक बनावे. (Gurumauli appeal to combine spirituality and science in service work nashik news)
त्यानंतर उपासक, प्रचारक आणि प्रसारक बनावे. जे अज्ञानी लोक आहेत, त्यांना सज्ञानी करून त्यांनाही दुःख, चिंता आणि समस्यामुक्त करण्यासाठी योगदान द्यावे. गुरुमाउलींच्या या आवाहनाला उपस्थित सेवेकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.
‘मानवी समस्या आज मोठ्या प्रमाणात आहेत. मानवी समस्या निर्मूलनासाठी प्रश्नोत्तरे विभागाने झोकून देऊन काम करावे,’ अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली. विवाह मंडळे गावागावांत स्थापन व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. हवनयुक्त नवनाथ पारायणामुळे पावसाचे पुनरागमन झाले असले, तरी सर्व सेवेकरी आणि शेतकऱ्यांनी पर्जन्यसूक्ताचे पठण सुरूच ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दरवर्षी पंचकर्म केले तर आरोग्य उत्तम राहील आणि दवाखान्याची पायरी चढावी लागणार नाही, असेही गुरुमाउली म्हणाले. वास्तूमध्ये तोडफोड न करता उपाययोजना करा, असे त्यांनी सांगितले. कायदेशीर सल्लागार, प्रशासकीय कामकाज, मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती, भविष्यावरही त्यांनी भाष्य केले. रथयात्रेचे महत्त्वही त्यांनी सांगितले. गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे हेही उपस्थित होते.
गुरुचरित्र पारायण, मासिक महासत्संग
एकदिवसीय गुरुचरित्र पारायणात १७१ सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला, अशी माहिती गुरुमाउलींनी दिली. १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ जयंती साजरी केली जाणार आहे. २३ सप्टेंबरला मासिक महासत्संग होईल. गणेशोत्सवानिमित्त मासिक महासत्संगाच्या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे सामुदायिक पठण होणार आहे, असे गुरुमाउलींनी नमूद केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.