Gurumauli Annasaheb More : सामाजिक भावनेतून मानवाला दुःखमुक्त करा : गुरुमाऊली

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More esakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : सामाजिक सद्भावनेतून मानवाला दुःख, समस्या आणि चिंतामुक्त करा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सेवेकऱ्यांना केले.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री गुरुपीठात शनिवारी (ता.१९) साप्ताहिक सत्संग समारोह पार पडला, यावेळी गुरुमाऊलींनी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्याना संबोधित केले. (Gurumauli guidance Free human suffering through social spirits nashik news)

आपल्या अमृततुल्य हितगुजामध्ये गुरुमाऊली म्हणाले, की मानवाला घडविणे, त्याला चिंतामुक्त करणे आणि त्याच्या मनातील द्वैत घालविणे हा सेवा मार्गाचा उद्देश आहे.

त्याकरिता सक्रिय सेवेकऱ्यानी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून योगदान द्यावे. हे कार्य सर्वांनी मिळून करायचे आहे. त्याकरिता ग्रामअभियान राबविणे आवश्यक आहे. ग्रामअभियानाच्या माध्यमातून समाज बळकट व्हायला मदत होईल. तेव्हा सेवेकऱ्यानी दिवसभरातील थोडा वेळ ग्राम अभियानाला द्यावा अशी आज्ञा गुरुमाऊलींनी केली.

श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्राकडे केवळ कोमल करणी दे रामा, विमल करणी दे रामा, सज्जन संगती दे रामा आणि अभेद्य भक्ती दे रामा अशी प्रार्थना केली होती असे सांगताना गुरुमाऊलींनी देवाकडे काही मागू नका, देव न सांगता देत असतो मात्र आपले आचरण चांगले असावे असा उपदेश केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : दिव्याने दिवा- ज्योतीने ज्योत लावा! : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

आगामी गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळांनी ध्वनी प्रदूषण होणार नाही, सणाचे पावित्र्य सांभाळले जाईल अशा पद्धतीने उत्सव साजरा करावा तसेच या काळात पालकांनी आपल्या मुलांकडून गणेश स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष यांचे जास्तीत जास्त पठण करून घ्यावे अशी सूचना गुरुमाऊलींनी केली.

महावृक्षारोपण अभियानात आज पावेतो ४० लाख रोपांची लागवड झाली असून सव्वा कोटी महावृक्षारोपण अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक सेवेकऱ्यानी किमान पाच ,पाच झाडे अवश्य लावली पाहिजेत असे त्यांनी नमूद केले.

प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नवीन सेवेकऱ्याला सहज समजेल अशी सोपी सेवा समजावून सांगावी असे ते म्हणाले. २० ऑगस्टला ठाणे येथे प्रशिक्षण, २६ ऑगस्टला मासिक महासत्संग, २७ ऑगस्टला गुरुपीठात प्रशिक्षण, २८ ऑगस्टला मुंबई सत्संग समारोह, सप्टेंबरमध्ये पिठापूरमध्ये प्रशिक्षण आणि नोव्हेंबरमध्ये मराठवाड्यात पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचा मेळावा होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे, आबासाहेब मोरे हेही उपस्थित होते.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : भक्ती, ज्ञान, कर्माचा त्रिवेणी संगम साधा : गुरुमाउली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.