Gurumauli Annasaheb More : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असा मंत्र संत तुकाराम महाराजांनी दिला. गेल्या काही दिवसांत औद्योगिक प्रगतीच्या वादळात आपल्याला या संत वचनाचा विसर पडल्याने आज कुठे अतिवृष्टी, तर कुठे अल्पपर्जन्य अशी विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. (Gurumauli guidance to Cultivate 5 trees each nashik news)
अनेक वन्यजीव, औषधी, उपयोगी वनस्पतीचा ऱ्हास होतो. पर्यावरणाचा हा बिघडलेला तोल सावरण्यासाठी श्री स्वामी सेवामार्गाच्या माध्यमातून सव्वा कोटी महावृक्षारोपण आणि संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतला असून, या अभियानात गतवर्षी १५ लाख झाडे लावून त्यापैकी मोठ्या संख्येने झाडे जगवून त्यांचे संवर्धन करण्याचे काम सेवेकरी करीत आहेत.
ही संख्या यावर्षी ४० लाखांपर्यंत घेऊन जाऊया, तीन वर्षांत आपल्या लाखो सेवेकरी, गावकरी तसेच महानगरवासीयांच्या माध्यमातून एक कोटींचा संकल्प पूर्ण करावयाचा असल्याने प्रत्येक सेवेकरी आणि नागरिकाने पाच झाडे लावून ती संवर्धित करण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले.
त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे साप्ताहिक बैठकीनिमित्त उपस्थित महिला, पुरुष सेवेकऱ्यांशी हितगूज करताना गुरुमाउलींनी हे आवाहन केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वृक्षारोपण अभियानाबाबत सेवेकऱ्यांशी संवाद साधताना गुरुमाउलींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा गौरव करीत २५० वर्षांपूर्वी महाराणी अहिल्यादेवी यांनी केलेल्या कार्याची माहिती तर दिलीच; पण हे जीवनादर्श पुढील पिढ्यांपर्यंत पोचवून आपला हा समृद्ध वारसा त्यांच्यापर्यंत घेऊन जायलाच हवे, असा आग्रह केला.
अहिल्यादेवी यांनी महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण भारतात जाऊन मंदिरे उभी केलीच; पण याबरोबर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे लावली. पर्यावरण रक्षणाबरोबरच वाटसरूंना सावली या झाडांनी दिली. याप्रमाणे पिण्याच्या पाण्याची सोय अहिल्यादेवी यांनी केली.
काशीतील भव्य व सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान काशी विश्वनाथ मंदिर आणि तेथील अजूनही भक्कम, सुंदर घाट यांची उभारणी अहिल्यादेवी यांनी केली, हे किती युवकांना माहीत..? म्हणूनच वृक्षारोपण अभियानाबरोबर हा वैभवशाली इतिहासही आपण सांगावा, असे आवाहन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.