Gurumauli Annasaheb More : सर्वांगीण विकासासाठी गावे दत्तक घ्या : गुरुमाउली

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : ग्रामअभियानाच्या माध्यमातून सेवेकऱ्यांनी गावे दत्तक घ्यावीत आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी गुरुवारी (ता.१२) केले.

श्री दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुवारी साप्ताहिक प्रश्नोत्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह झाला. या वेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी गुरुमाउलींनी संवाद साधला.

गुरुमाउली म्हणाले, की मानव समाज कर्जमुक्त, दुःखमुक्त आणि चिंतामुक्त होणे गरजेचे आहे. हेच कार्य आज दिंडोरीप्रणीत सेवामार्गाच्या माध्यमातून सुरू आहे. (Gurumauli statement about Adopted village for holistic development nashik news)

त्यासाठी ग्रामअभियानावर भर दिला जात आहे. ग्रामअभियानाच्या माध्यमातून गावे दत्तक घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच स्वामी महाराजांचे सेवाकार्य शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचे काम सेवेकऱ्यानी करावे, अशी आज्ञा गुरुमाउलींनी केली.

पितृपक्षावर बोलताना ते म्हणाले, की मृत पूर्वजाची अत्येष्ठी झाली नाही, तर त्या कुटुंबात दुःख, संकटे निर्माण होतात. मात्र, त्याचा कार्यकारणभाव समजत नाही आणि कुटुंबातील लोक अक्षरशः हैराण होतात. त्यामुळे मृत पूर्वजांचे दर वर्षी मघलय श्राद्ध घालणे गरजेचे आहे. तिथी माहीत नसल्यास सर्वपित्री अमावास्येला मघलय आणि पितृतर्पण विधी अवश्‍य करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : भारतीय संस्कृतीत पितरांच्या सेवेला महत्त्व : गुरुमाउली

दिंडोरीप्रणीत यू-ट्यूब चॅनलवरून पितृपक्षात रोज सायंकाळी सातला ऑनलाइन सातशे श्‍लोकी सामुदायिक भागवत पारायण घेतले जाते. पितरांना सद्‌गती मिळावी, यासाठी भागवत पारायण ही सर्वोच्च सेवा आहे, असे गुरुमाउली म्हणाले. सेवामार्गामध्ये कॅन्सरवर रामबाण औषध उपलब्ध असून, त्याआधारे कॅन्सरमुक्त जीवन जगता येणे शक्य आहे.

त्याकरिता काही पथ्यपाणी सांभाळले आणि आध्यात्मिक सेवांसह नियतपणे आयुर्वेदिक औषधे घेतली, तर भरमसाट खर्च, केमो, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया करावी लागत नाही. या औषधांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असेही गुरुमाउलींनी सांगितले. आपल्या अमृततुल्य हितगुजामध्ये गुरुमाउलींनी मूल्यसंस्कार, विवाह, शेती, मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती, प्रशासकीय, पर्यावरण आदी १८ पित्तात्रांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर पालखी सोहळा पार पडला.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : देशवासीयांना सेवेकरी बनवा : गुरुमाउली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.