Swami Samarth Gurupeeth : राज्यभरातील प्रमुख समर्थ सेवेकऱ्यांना गुरूपीठातून मार्गदर्शन करणार गुरुमाऊली

Swami Samarth Gurupeeth
Swami Samarth Gurupeethesakal
Updated on

Nashik News : त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात आज (ता.२) राज्यभरातून आलेल्या प्रमुख समर्थ सेवेकऱ्यांना गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे समर्थ केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी काय करता येईल, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. (Gurumauli will guide prominent samarth sevekari from across state from Gurupeeth nashik news)

१९९२ पासून जेव्हा समर्थ गुरुपीठाची पायाभरणी झाली अगदी तेव्हापासून महिन्याच्या चौथ्या शनिवारी सेवा मार्गातील सर्व केंद्र, तालुका, जिल्हा प्रमुख आणि विविध उपक्रमात आणि विविध विभागात सक्रिय सेवेकरी गुरुपीठात एकत्रित होतात.

या महासभेत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे राज्यात व देशभरात सुरू असलेल्या सेवा, समाजकार्याचा आढावा घेऊन पुढील महिन्यात करावयाच्या कार्याबाबत मार्गदर्शन करतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Swami Samarth Gurupeeth
Nashik SSC Result Update : शहरासह ग्रामीणमध्ये सावित्रीच्या लेकीच हुशार..!

आता सेवामार्गाचा जगभर वाढता पसारा लक्षात घेता दर महिन्यातील चौथ्या शनिवारी महासभा होतेच पण दर शनिवारी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, गुरुपीठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे, देशविदेश अभियान आणि कृषी अभियान प्रमुख नितीनभाऊ व आबासाहेब मोरे समर्थ गुरुपीठात उपस्थित राहून मार्गदर्शन तर करतातच पण केंद्रनिहाय आढावा घेऊन अडीअडचणी ऐकून त्यावर प्रशासकीय चर्चा करून पुढील दिशा ठरवतात.

आजच्या सभेत प्रामुख्याने नेपाळ मधील मेळाव्याची चर्चा होईल. १० जून रोजी नेपाळमध्ये भव्य लिंगार्चन सोहळा आणि गुरुमाऊलींचे हितगूज असा कार्यक्रम होत आहे. या सोहळ्यात भारतभरातून जवळपास एक लक्ष सेवेकरी जात आहेत.

हा सोहळा नीटनेटका पार पाडण्यासाठी आज चर्चा होईल. आज सकाळी भूपाळी आरती व त्यानंतर नैवेद्य आरती होईल. दुपारच्या सत्रात गुरुमाऊली मार्गदर्शन करतील आणि सायंकाळी पुन्हा आरतीची सेवा रुजू होईल.

Swami Samarth Gurupeeth
Nashik Rain Update : जिल्ह्याच्या काही भागात आजपासून 2 दिवस मध्यम पावसाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.