Sinnar Unseasonal Rain : सिन्नरमध्ये अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा

Sinnar Unseasonal Rain
Sinnar Unseasonal Rainesakal
Updated on

Sinnar Unseasonal Rain : सिन्नर तालुक्यात व शहरात अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा सह अनेक भागात जोरदार पाणी वाहण्यास सुरुवात झाली होती. तालुक्यात सकाळ पासून वीजप्रवाह खंडीत असल्याने बँका, कारखाने, शाळा यांना दिवसभर अडचणींचा सामना करावा लागत होता.

अशातच घरात पण लाईट नसल्याने दिवसभर नागरीकांना गरमीचा त्रास सहन करावा लागला. या अवकळी पावसाने पुन्हा पिकांवर संकट निर्माण झाले आहेत. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने सर्वाची धावपळ केली. (Gusty wind with unseasonal rain in Sinnar nashik news)

अवकाळी पाऊस काही थांबण्याच्या स्थितीत नाही शनिवारी पाच वाजता सायंकाळी रोजी सायंकाळी अचानकपणे पावसाला सुरुवात झाली बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली सायंकाळच्या वेळी शेतात काम करीत असताना अचानकपणे वरून राजाचे आगमन झाले.

मात्र सायंकाळच्या वेळेस सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली सायंकाळी सुरू झालेल्या पावसामध्ये वादळ नसल्यामुळे नुकसानी झाल्या नाही मात्र पावसाचा जोर वाढतच राहिला वाढत्या पावसाच्या सरीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत.

सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण असल्यामुळे सायंकाळी वरून राजाचे आगमन झाले. बेमोसमी पाऊस काही पाठशिवणीचा खेळ सोडावयास तयार नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Sinnar Unseasonal Rain
Unseasonal Rain Damage : सुरगाणा तालुक्यात अवकाळीने झोडपले; 2 तास पाऊस

यापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे कांदापोळीआजही शेतामध्ये पडून आहे भाव नसल्यामुळे शेतकरी वर्ग दररोज त्या कांदापोळीवरती प्लास्टिक कागदाने झाकण्याचे काम करत आहे.

मात्र एकीकडे कमी झालेला बाजार भाव व दुसरीकडे पावसामुळे भिजलेला कांदा मोठ्या प्रमाणावर वाढत असून . नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी हिच आशा बळीराजाला लागून राहिलेली आहेत.

दिवसेंदिवस हवामानातील बदल या तिन्ही ऋतूचा बदलावा अनेक पिकांवर होत असून. शेती आता कशी करावी ह्या विवंचनेत सर्व आहेत.एकीकडे आर्थिक भांडवल संपलेले असून. पुढचा दिवस हा नक्कीच बदलल. अशी आशा प्रत्येकालाच वाटत आहेत. पण आस्मानी संकट कधी दूर होईल अशा विचारात सर्वच आहेत

Sinnar Unseasonal Rain
Unseasonal Rain Crop Damage : पावणे 4 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.