Nashik Crime News : ग्रामीण पोलीस दलाने सुरू केलेल्या गुटखा विरोधी अभियान 2 अंतर्गत मध्यप्रदेश मधून नाशिककडे येत असलेल्या गुटख्याचा साठा ओझर पोलिसांनी पकडुन सुमारे तीस लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Gutkha worth 20 lakhs seized on Mumbai Agra highway nashik crime news)
याबाबत सविस्तर माहिती अशी की ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना शनिवारी रात्री गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली की चांदवड नाशिक कडे विटकरी रंगाच्या आयशर टेम्पो क्र. एम पी ०९ जी एफ ५३०६ यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी ओझर पोलिसांना याबाबत तपासाच्या सूचना केल्यानंतर खासगी वाहन घेत पोलिसांनी महामार्गावर गस्त घालत असताना रविवारी दुपारी अडीच वाजता सदर वाहन जात असल्याचे आढळून आले.
त्यांनी एचएएल गेट क्रमांक तीन जवळ त्यास थांबवले. पोलिसांनी मालाची चौकशी अंती चालकाला विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
संशय बळावल्याने त्यांनी टेम्पो ओझर पोलीस ठाण्यात आणून दुर्गेश तिवारी यांच्या समक्ष मागील ताडपत्री उघडण्यास सांगितले. त्यात सिगारेट बॉक्सच्या मागील बाजूस सफेद रंगाच्या तीस पोत्यात गुटखा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी मुद्देमाल सहा ट्रक जप्त करत चालक दीपक चतुर्वेदी, साथीदार मुकेशसिंग बना सिंग परमार यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सदर माल इंदोरहून भिवंडी कडे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्यासह किशोर अहिरराव,दीपक गुंजाळ, विश्वनाथ धारबळे, बंडू हेंगडे,अनुपम जाधव,रमेश चव्हाण,राजेंद्र डंबाळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गेश तिवारी करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.