Nashik Crime: पिंपरवाडी टोल नाक्यावर 31 लाखांचा गुटखा पकडला; 5 जणांना अटक

या ट्रकची तपासणी करत असताना इनोवा कार मधून आलेल्या तिघांनी पोलिसांना आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला होता.
Vavi Police Team
Vavi Police Teamesakal
Updated on

Nashik Crime : सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पिंपरवाडी येथील टोल नाक्यावर मंगळवारी दि.१५ रात्री नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत असताना वावी पोलिसांना मोठे घबाड मिळून आले.

अमरावती येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकमध्ये तब्बल 31 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. (Gutkha worth 31 lakh seized at sinnar shirdi national highway Pimperwadi toll booth 5 people arrested Nashik Crime \)

या ट्रकची तपासणी करत असताना इनोवा कार मधून आलेल्या तिघांनी पोलिसांना आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला होता. ट्रक मध्ये रेतीच्या गोण्यांच्या आड गुटखा दडवून ठेवला असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी सदर ट्रक व इनोव्हा कार पोलीस ठाण्यात आणून संपूर्ण तपासणी केली.

त्यावेळी महाराष्ट्र राज्यात विक्री आणि वाहतुकीस प्रतिबंधित असलेला ' नजर 9000' या गुटख्याचा ३० लाख ७८ हजार रुपयांचा साठा आढळून आला. पोलिसांनी ट्रक मधील दोघांसह इनोव्हा कार मधील तीन जणांना ताब्यात घेतले.

त्या सर्वांचे विरोधात बुधवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत मालट्रक आणि इनोव्हा कार मिळून 50 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांकडून अवैध व्यवसाय आणि गुटखा, अमली पदार्थ विरोधी अभियान सुरू आहे.

ग्रामीण पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या ऑल आउट नाकाबंदी दरम्यान निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पोलीस नाईक देवा माळी, शहाजी शिंदे, पंकज मोंढे, सचिन कहाने, पोलीस शिपाई भास्कर जाधव, राजू चौधरी, तुषार दयाळ हे सिन्नर शिर्डी महामार्गावरील पिंपरवाडी येथील टोलनाक्यावर मंगळवारी रात्री अकरा वाजेपासून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vavi Police Team
Pune Crime News : पुण्यात पाकिस्तान झिंदाबादचे नारे; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

रात्री साडे अकरा ते पावणे बारा वाजेच्या सुमारास शिर्डीहून सिन्नरच्या बाजूकडे येणारा अशोक लेलँड कंपनीचा बाराचाकी माल ट्रक क्र. एमएच २८ बीबी २४३८ पोलिसांनी थांबवला.

या ट्रकमधून काहीसा उग्र वास येत असल्याने पोलिसांनी चालकाला विचारणा केली असता त्याने ट्रक मध्ये रेती भरलेल्या गोण्या असल्याचे सांगितले. उपनिरीक्षक श्री अहेर यांनी आपल्या सहकाऱ्यांना या ट्रकची तपासणी घेण्याचे निर्देश दिले.

पाठीमागून आलेल्या इनोवा कार क्र. एमएच ४६ एल २९९९ मधील तिघांनी पोलिसांना झडती घेऊ द्यायला विरोध केला. त्यामुळे संशय अधिक बळावला. दिवसांनी ट्रक मधील रेती भरलेल्या गोण्यांची थप्पी बाजूला केली असता आत मध्ये प्लास्टिक गोण्यांमध्ये गुटखा असल्याचे निष्पन्न झाले.

ट्रक चालक व इनोव्हा मधील प्रवाशांनी देखील कबुली दिली. दिवसांनी दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणली तिथे पंचांच्या समक्ष ट्रक मधील रेतीच्या गोण्या बाजूला करून प्लास्टिक गोण्या बाहेर काढण्यात आल्या.

त्याची मोजदाद केली असता ३० लाख ७८ हजार रूपये किमतीचा ७५ सफेद गोण्यामध्ये भरलेला, प्रत्येक गोणीत वेगवेगळी ६ पॅकीग व प्रत्येक पॅकीग मध्ये ५७ पाकीटे, एका पाकीटामध्ये '७२ Premium नजर ९००००'असे नाव असलेला गुटखा मिळाला.

पोलिस नाईक देवीदास माळी यांच्या फिर्यादवरून वावी पोलीस ठान्यात सलीम खान अफसर खान वय ३५ रा. अलीमनगर, अफसर किराणा समोर अमरावती, अहमद खान रेहमद खान वय ३५ रा ताजनगर अमरावती, समीर खान अफसर खान वय ३३ रा. अमरावती अलीमनगर, अफसर किराणा समोर अमरावती, शेख रेहमान शेख रहीम वय ३१ रा. मुजफरपुरा अमरावती, अरीफ खान दिलावर खान वय ३६ रा ताजनगर अमरावती यांच्या विरोधात गून्हा दाखल करून त्यांना लागलीच अटक करण्यात आली.

Vavi Police Team
Crime News: धक्कादायक! पुण्यातील मंगला टॉकीजबाहेर तरूणाचा निर्घृण खून; चित्रपट पाहून बाहेर येताच कोयते, तलवार, दगडाने ठेचले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.