Nashik Crime : मालेगावला 75 हजाराचा गुटखा जप्त

Crime
Crimeesakal
Updated on

Nashik Crime : शहरातील कलेक्टर पट्टा भागातील इंद्रकुट नगर व जुन्या महामार्गावरील देवीचा मळा भागातील अक्सा ट्रेडर्स या दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ७५ हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला. (Gutkha worth 75 thousand seized from Malegaon nashik crime news)

पोलिसांनी अवैध गुटखा बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या दोघा संशयितांना अटक केली आहे.

छावणी पोलिसांनी कलेक्टरपट्टा भागातील मल्हार कॉलनीमधील निखिल कोठावदे (२२, रा. कलेक्टरपट्टा संगमेश्‍वर) यांच्या घरी छापा टाकून सुमारे ६७ हजार ५५६ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime
Nashik Crime News : स्वतःच्याच गोडाऊनला मालकाने लावली आग; बनाव उघड

याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवारवाडी पोलिसांनी देवीचा मळा भागातील मोहम्मद इजाज युसूफ (वय २८) यांच्या मालकीच्या अक्सा ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकून सुमारे १३ हजार ८०० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन कारवाईत पोलिसांनी सुमारे ८१ हजार ३५६ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

Crime
Nashik Crime News : माजी आमदार आसिफ शेख यांच्याविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.