Unseasonal Rain Damage
Unseasonal Rain Damageesakal

Unseasonal Rain : करंजाडी खोऱ्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने दाणादाण; घरांचीही पडझड

Published on

Unseasonal Rain : करंजाडी परिसरात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. बिजोटेत वीज वितरण कंपनीचा रोहित्र वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला.

तर करंजाड येथील शेतकरी यांचे घरांचे पत्रे उडाले यात वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला. कांदा, डाळींब पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. (Hailstorm with gale in Karanjadi Valley Fall of houses Unseasonal Rain damage nashik news)

घरांचे पत्रे वादळात उडाले
घरांचे पत्रे वादळात उडालेesakal

 करंजाडी परिसरातील करंजाड, भडाणे, बिजोटे, आखतवाडे, निताणे, पारनेर, आनंदपुर भागात तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार वादळी वारा व गारपीटीने झोडपले. वादळी वाऱ्यामुळे बिजोटेतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मोठे नुकसान झाले असून दुकान, किशोर बच्छाव यांचे हाॅटेल वैष्णवी, घरांचे पत्रे वादळात उडाले.

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले असून बहुतांश भागात कांदा उत्पादक शेतातील कांदा काढणीत व्यस्त असतांनाच वीजेचा कडकडाटात, वादळ, अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले यामुळे शेतातील संपूर्ण कांदा भिजून पडला असून रस्त्यावर गारांचा खच दिसून येत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

वीज वितरण कंपनीचा रोहित्र वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला.
वीज वितरण कंपनीचा रोहित्र वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला.esakal
Unseasonal Rain Damage
Jalgaon Unseasonal Rain : जळगावात कोसळल्या पावसाच्या सरी; वातावरणात उकाडा

करंजाड येथील शेतकरी शंकर दगा देवरे यांच्या घरावरील पत्रे वादळात उडाले त्याच्या गोठ्यातील वासरीवर दगड पडल्याने जागीच मृत पडले तसेच बळवंत वेताळ यांच्या घराचीही हानी झाली असून वादळात कुटुंबातील सदस्यांकडून सावधानता वाळगल्याने पुढील अनर्थ टळला.

आखतवाडे, पारनेर, निताणे, भडाणे, या गावातही मोठ्या प्रमाणात घरांचे तसेच शेतीशिवारात कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. शासकीय नुकसानग्रस्त भागात आमदार दिलीप बोरसे पाहणी करून शेतक-यांचे सांत्वन केले व शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

Unseasonal Rain Damage
Dhule Unseasonal Rain : पिंपळनेरसह परिसरात अवकाळी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.