Nashik News: सायखेड्यात हळदी कुंकवाला तृतीयपंथीयांना मान! गोदाकाठ पत्रकार संघ, सायखेडा पोलिसांचा संयुक्त उपक्रम

महिलांकडून वाण स्वीकारून त्यांनी स्त्रीत्वाचा खरा दागिना मिळविला आणि हृदय सन्मान सोहळा गोदाकाठवासीयांनी अभिमानाने बघितला.
Women attending the program of Haldi Kunkva, Tertipanti Bhagini
Women attending the program of Haldi Kunkva, Tertipanti Bhaginiesakal
Updated on

चांदोरी : आजपर्यंत आपल्या भावनांना बांध घातला, मनाने बाई असूनही पुरुषी हावभावांमुळे समाजाची हेटाळणी सहन केली ते तृतीयपंथी स्वाभिमानाने नटले.

सौभाग्याच लेणे कपाळी लेऊन ते ताठ मानेने उभे राहिले. महिलांकडून वाण स्वीकारून त्यांनी स्त्रीत्वाचा खरा दागिना मिळविला आणि हृदय सन्मान सोहळा गोदाकाठवासीयांनी अभिमानाने बघितला. (Haldi Kunku function honor transgenders in Saikheda Joint initiative of Godakath Journalists Union Saikheda Police Nashik News)

गोदाकाठ पत्रकार संघ व सायखेडा पोलिस ठाण्यातर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. प्रारंभी निर्मला खर्डे, उर्मिला गुरू, हेमा गुरू, भक्ती पालवे, प्रीती पाटील, ‘महाज्योती’च्या समन्वयक सुवर्णा पगार, पोलिस उपनिरीक्षक योगिता पाटील यांनी दीपप्रज्वलन केले.

सुवर्णा पगार म्हणाल्या, की महिलांनी सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी सावित्रीबाई फुले वाचायला हव्यात. आपल्याला हा क्षण सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच प्राप्त झाल्याचे तृतीयपंथी भगिनी नेहा व रोशनी यांनी सांगितले.

अश्‍पाक शेख, निर्मला खर्डे यासह इतर अनेक महिलांनी मनोगतात तृतीयपंथी भगिनी, एकल महिलांसह विधवा महिलांचा सन्मान केला, याबद्दल कौतुक केले.

Women attending the program of Haldi Kunkva, Tertipanti Bhagini
Nashik News : चौकशीअंती 5 योजनांचे काम सुरू; त्र्यंबक तालुक्यातील जलजीवन योजनांची 2 दिवस चौकशी

राजेंद्र आहेर यांनी सूत्रसंचालन केले. पोलिसपाटील अरुण बोडके यांनी आभार मानले. सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील, राशी, जीविका, निकिता, नेहा, भक्ती निलेश पालवे, प्रीती सुनील पाटील, महिला पोलिस कविता चौधरी, उर्मिला काठे, सुनीता बोडके, संध्या पानसरे, अश्विनी वाजे, शीतल चक्रणारायन, शमीना शेख, ॲड. तेजल पवार, खेरवाडी ग्रामपंचायत सदस्या योगिता पाटील व महिला उपस्थित होत्या.

तामसवाडी येथील रहिवासी व डीवायएसपी आनंद कांदे यांचा गोदाकाठ पत्रकार संघ व पोलिसांतर्फे बाजीराव कमानकर, संजय भागवत यांनी सत्कार केला. उपनिरीक्षक योगिता पाटील व गोदाकाठ पत्रकार संघाचा सत्कार उद्योजक विलास पाटील यांनी केला.

"खऱ्या अर्थाने गोदाकाठ पत्रकार संघ व सायखेडा पोलिसांतर्फे झालेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आम्ही संक्रांतीचे वाण लुटले. प्रथमच अशा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने आनंद काही औरच आहे."-हेमा गुरू

"आजवर उपेक्षित असलेल्या तृतीयपंथी भगिनींनाही कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याने खऱ्या अर्थाने हळदी कुंकू कार्यक्रमाचा हेतू साध्य झाला."

-ॲड. तेजल पवार, पोलिसपाटील, खेरवाडी

Women attending the program of Haldi Kunkva, Tertipanti Bhagini
Nashik MSBCC Survey: पहिल्याच दिवशी सर्व्हेक्षणाला पोर्टलचा खो! मराठा कुटुंबातील 181 प्रकारची माहिती भरावी लागणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.