नाशिक : शहरातील त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा ख्यातीप्राप्त स्मार्ट रोड वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे. स्मार्ट रोडच्या दुतर्फा चारचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे ‘दिवसभर’ या रोडवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. त्र्यंबक नाका ते रविवार कारंजा या अवघ्या तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल पाऊस तास वाहनचालकांना लागतो.
तर दुसरीकडे नो- पार्किंगमधील वाहनांची टोइंग करणारे वाहतूक पोलिसांचे या रोडवरील अनधिकृतपणे पार्क केलेल्या चारचाकीवर कोणतीही कारवाई होत नाही. कोंडी होऊनही सिग्नलवरील पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याने त्रस्त नाशिककरांचा रोष वाढतो आहे. (half hour for distance of 3 kilometers Dilemma due to two way parking Nashik Traffic News)
मंगळवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयावर कोणताही मोर्चा वा निदर्शने नव्हती. जिल्हाधिकारी कार्यालयात कोणत्याही मंत्र्यांची बैठकही नव्हती. सकाळच्या १० ते १२ वाजेच्या दरम्यान कामावर जाणाऱ्यांची गर्दी असल्याने या काळात त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या स्मार्ट रोडवर वाहतूक कोंडी होते. परंतु दुपारी दीडच्या सुमारास असे काहीही नसताना, मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नलपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. तर, सीबीएस सिग्नलही या वाहतूक कोंडीमुळे कोलमडला.
त्यामुळे त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंत वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली होती. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकाला मात्र मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्र्यंबक नाका सिग्नलकडून स्मार्ट रोडने रविवार कारंजाकडे निघालेल्या प्रवाशाला तब्बल पाऊण तासाचा कालावधी लागल्याने अनेकांना या वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागला. शहर वाहतुकीसाठी सिटीलिंकच्या पाच ते सात बस या वाहतूक कोंडीत अडकलेल्या होत्या. तर, रिक्षातून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी रिक्षातून उतरून पायी जाण्याचा मार्ग निवडला.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
अनधिकृत कार पार्किंगमुळे कोंडी
त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या स्मार्ट रोडवर दुतर्फा पादचाऱ्यांसाठी फुटपाथ व सायकल ट्रॅक केलेला आहे. फुटपाथ पादचाऱ्यांसाठी असताना, त्याचा अनधिकृतरीत्या दुचाक्या पार्किंगसाठी वापर केला जातो आहे. तर, सायकल ट्रॅकवरून आजतागायत एकही सायकल धावताना दिसत नाही. परंतु, त्यावर चारचाकी वाहनांची अनधिकृतरीत्या पार्किंग केली जाते. चारचाकी वाहनांच्या या पार्किंगमुळे स्मार्ट रोड वाहतुकीसाठी अरुंद होतो आणि त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होतो आहे.
वाहतूक पोलिसांची उदासीनता
अशोक स्तंभ, सीबीएस चौक, त्र्यंबक नाका या ठिकाणी वाहतूक पोलिस नेमलेले असतात. परंतु वाहतूक कोंडी झाल्यास या ठिकाणी वाहतूक पोलिस असतात असे नव्हे. परंतु असतीलच तरीही ते वाहतूक कोंडी सोडविण्याकडे साफ दुर्लक्ष करतात आणि केवळ बघ्याची भूमिका बजावतात. विशेषतः: सीबीएस चौकात एकापेक्षा अधिक वाहतूक पोलिस असतात. मात्र कोंडीच नव्हे तर अनधिकृत पार्किंगमधील चारचाकी वाहनांवर इ-चलनाद्वारे दंडाचीही कारवाई करीत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.