Nashik : पाथर्डी फाट्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर हातोडा!

Staff while taking action on encroachments at pathardi phata
Staff while taking action on encroachments at pathardi phataesakal
Updated on

सिडको (जि. नाशिक) : पाथर्डी फाटा येथे गुरुवारी (ता. १७) महाले पेट्रोल पंपासमोर अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. वाहतुकीस होणारा अडथळा लक्षात घेता हे अतिक्रमण काढणे अत्यावश्यक असल्याने सिडको- विभागाचे अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी धडक मोहीम राबवली. ही मोहीमेआधी सकाळी ११ वाजता जाऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेथील टपरी धारकांना गाड्या काढण्याच्या सूचनादेखील दिल्या होत्या. परंतु दुपारी दोननंतरही येथील टपरीधारकांनी दुकाने काढले नसल्याने अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. (Hammer on encroachment obstructing traffic on Pathardi Phata by NMC Nashik Latest Marathi News)

अतिक्रमण मोहिमेत सिडको विभागीय कार्यालयाचे १० ते २० कर्मचारी, पोलिस पथक व तीन मोठ्या गाड्यांचा फौजफाटा पोचल्यानंतर अतिक्रमण मोहिमेस सुरवात करण्यात आली. या वेळी येथील चायनीज गाड्या, अंडाभुर्जी विक्रेते, फळ विक्रेते, भाजीची गाडीचे अतिक्रमण काढले.

अतिक्रमण काढत असताना येथे एक अंडाभुर्जी गाडीस एक जाड साखळी व भलेमोठे कुलूप लावण्यात आलेले असताना अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी त्या कुलूपावर घन मारून तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकांचे प्रयत्न झाल्यानंतर सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी तो घन हातात घेऊन तीन चार प्रयत्नातच ते कुलूप तोडून टाकले. या मुळे उपस्थितांनी त्यांना चक्क बाहुबली पदवीच बहाल केली.

Staff while taking action on encroachments at pathardi phata
Measles Awarness : गोवरबाबत NMCकडून जनजागृती मोहीम

राजकीय हस्तक्षेप

पाथर्डी फाटा येथे शिवसेना उद्धव ठाकरे महिला आघाडी गटाच्या श्रुती नाईक यांनी गरजू महिलांसाठी एक हॉटेल सुरु केले आहे. अतिक्रमण कारवाई सुरू असताना मनपा कर्मचाऱ्यांनी सदर हॉटेलचे साहित्य अतिक्रमण कारवाई करताना उचलले असता, त्यांनी अतिक्रमण विभागाचा कर्मचाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची केली. तरीही अतिक्रमण विभागानेही येथील साहित्य जमा केले.

"रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असून, सिडको विभागीय कार्यालयाकडूनदेखील अतिक्रमण मोहीम सुरू आहे. रस्त्यावरील वाहतुकीस मोठ्या स्वरूपात अडथळा निर्माण होत असून, पार्किंग जागेमध्ये व्यवसाय सुरू आहेत. याच अनुषंगाने पाथर्डी फाटा येथे अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली."

- डॉ. मयूर पाटील, सिडको विभागीय अधिकारी

"पाथर्डी फाटा येथे आज अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीकडून काही गरीब महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून एक छोटे दुकान सुरू करून दिले आहे. त्या दुकानावरही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. साहित्य जमा करण्यात आले. जमा केलेले साहित्य पुन्हा मिळवून द्यावे यासाठी मोहीम सुरू असताना हस्तक्षेप करत मध्यस्थी केली."

- श्रुती नाईक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

Staff while taking action on encroachments at pathardi phata
Nashik : वीज सुरक्षेसाठी अभियंत्याने रचले गीत; सावधानतेची जाणीव होण्यासाठी जनजागृती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()