NMC News : अपघातप्रवण क्षेत्रातील अतिक्रमणांवर हातोडा; पंचवटी विभागातून होणार कारवाई

शहरातील २६ अपघातप्रवण क्षेत्रातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई अखेरच्या टप्प्यात आली असून अतिक्रमण निर्मूलन पथकाने पंचवटी विभागातून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
accident black spot
accident black spotesakal
Updated on

नाशिक : शहरातील २६ अपघातप्रवण क्षेत्रातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई अखेरच्या टप्प्यात आली असून अतिक्रमण निर्मूलन पथकाने पंचवटी विभागातून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

कारवाईसाठी पोलिस बंदोबस्ताचीदेखील मागणी करण्यात आली आहे. (Hammer on encroachments in accident prone areas Action will taken from Panchvati Division NMC News nashik)

पंचवटी विभागातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हॉटेल मिरची चौकात ८ ऑक्टोबर २०२२ ला बस दुर्घटना होऊन त्यात २२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली.

दुर्घटनास्थळाची त्यांनी तातडीने पाहणी करून अपघातप्रवण क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे सूचना दिल्या. त्याअनुषंगाने महापालिका जिल्हाधिकारी व पोलिस यंत्रणेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, शहर पोलिस वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या मदतीने संयुक्त सर्वेक्षण केले. यात ब्लॅक स्पॉट असल्याचे आढळून आले.

मात्र ब्लॅक स्पॉट दूर करताना अतिक्रमणांची मोठी अडचण होती. अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली. पहिल्या टप्प्यात हॉटेल मिरची चौकातील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर अतिक्रमण हटविले गेले नाही.

accident black spot
Nashik News: दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे राजीवनगरचे रहिवासी हैराण! ड्रेनेज समस्या सोडविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून रेखांकन झाले नाही. त्यामुळे अतिक्रमण विभागाला कारवाई करता आली नाही. नगररचना विभागाला या संदर्भात पाच वेळा स्मरणपत्र दिले.

त्यानंतर अखेर नगररचना विभागाने अतिक्रमणासंदर्भात अहवाल सादर केला. त्याअनुषंगाने आता २६ अपघातप्रवण क्षेत्रातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाणार आहे.

"पुढील आठवड्यापासून अपघातप्रवण क्षेत्रातील अतिक्रमणे हटविले जाणार आहे. पंचवटी विभागातून कारवाईला सुरवात होईल. त्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे."- नितीन नेर, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग.

accident black spot
NMC Slum Survey: मोफत घरासह जमिनी बळकविण्याचे प्रकार! शहरातील झोपडपट्ट्यांचे नव्याने सर्वेक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.