लासलगाव (जि. नाशिक) : होळी ते श्री हनुमान जन्मोत्सव या कालावधीत लासलगावकरांतर्फे श्री हनुमान चालीसा पाठ उत्सव सुरू असून या कार्यक्रमास महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे.
मंगळवारी (ता. १४) सायंकाळी लासलगाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात श्री हनुमान चालीसा पठणासाठी भाविकांनी उत्स्फूर्त गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. (Hanuman Janmotsav Bo Bajrang slogans Spontaneous response of devotees to Chalisa chanting in lasalgaon nashik news)
होळी ते हनुमान जन्मोत्सव या कालावधीत हिंदूंचे मोठ्या प्रमाणात सण साजरे केले जातात. याच पार्श्वभूमीवर शहरातील ठिकठिकाणी विविध मंदिर परिसर तसेच, सार्वजनिक ठिकाणी सायंकाळी श्री हनुमान चालीसा पठणाचे आयोजन ग्रामस्थांतर्फे करण्यात आलेले आहे.
श्री हनुमान प्रतिमेचे पूजन सरपंच जयदत्त होळकर, वेदिका होळकर, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, मुंबई येथील देवेश ठक्कर व विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भाविकांना भगव्या रंगाच्या टोप्या, श्री हनुमान चालीसा पुस्तकाचे वाटप यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. लासलगाव, टाकळी विंचूर, ब्राह्मणगाव विंचूर, पिंपळगाव नजीक, कोटमगाव, विंचूर व परिसरातील भाविक सहभागी होते. ६ एप्रिलपर्यंत हनुमान चालीसा पठण कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
असे होणार कार्यक्रम
शनिवारी (ता. १८) श्री लक्ष्मीनारायण मंदिर, मंगळवारी (ता. २१) श्री दुर्गा माता मंदिर, गणेशनगर, बुधवारी (ता.२२) श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनिवारी (ता. २५) श्री हनुमान मंदिर, ब्राह्मणगाव, मंगळवारी (ता.२८) श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर, गुरुवारी (ता.३०) सायंकाळी पाचला श्री बाबा अमरनाथ मंदिर, शुक्रवारी (ता. ३१) क्रांतीचौक श्रीरामनगर, शनिवारी (ता.१) एप्रिल हनुमान मंदिर पिंपळगाव नजीक, रविवारी (ता. २) श्री विठ्ठल मंदिर टाकळी विंचूर, सोमवारी (ता.३) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर लासलगाव, मंगळवारी (ता. ४) यशवंतनगर, सुमननगर, बुधवारी (ता.५) हनुमान मंदिर, रेल्वेस्टेशन, गुरुवारी (ता. ६) श्रीराममंदिर लासलगावला कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमांची वेळ रात्री नऊला असणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.