नाशिक : ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’चा नारा देत सात दिवसांपासून बेमुदत संपात उतरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. २०) सकाळी थाळीनाद आंदोलन केले. मात्र, समन्वय समितीची राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीत योग्य तोडगा निघाल्यानंतर सायंकाळी या कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केला.
मंगळवार (ता. २१) पासून शासकीय कामकाज नियमितपणे सुरू होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. (happy atmosphere among government employees after Strike end nashik news)
जुन्या पेन्शनसाठी राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार कर्मचारी यात सहभागी झाले. त्यांनी कामबंद आंदोलन करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले.
यात सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग यांसह तालुका स्तरावर पंचायत समिती, तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. डोक्यावर टोपी परिधान करून त्यावर ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असा संदेश लिहून कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
आदिवासी विकास विभागासमोर झालेल्या थाळीनाद आंदोलनात कर्मचाऱ्यांनी कविता सादर केली. आदिवासी शासकीय आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी आयुक्त कार्यालयातील कर्मचारी व आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर असे साधारणतः अडीच ते तीन हजार कर्मचारी सहभागी झाले.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयात थाळीनाद आंदोलन करत बेमुदत संपाची धग वाढविली. परंतु सायंकाळी राज्य सरकारने तोडगा काढल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सवही साजरा केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जल्लोष
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपावर सोमवारी तोडगा निघाल्यानंतर त्याविषयी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी जल्लोष करणार आहेत. जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभाग, जलसंपदा व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.