स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ : गंगाथरन डी

azadi ka amrit mohotsav
azadi ka amrit mohotsavesakal
Updated on

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Amrit Mahotsav of Independence) केंद्र सरकारकडून ११ ते १७ ऑगस्ट कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सर्व शासकीय कार्यालय आणि जिल्ह्यात उपक्रम प्रभावी राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. (Har Ghar Tiranga initiative of Amrit Mahotsav of Independence by district collector Gangatharan d Nashik News)

उपक्रम राबविण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यान्वयन समितीची बैठक जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वेळी बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलिस अधीक्षक नाशिक माधुरी कांगणे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. प्रकाश देशमुख, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. संजय नेरकर, जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश टिळे, जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी सुधीर केंडाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस. एम. महाजन यांच्यासह अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

उपक्रम यशस्वितेसाठी लोकप्रतिनिधी, शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्यासह शहरातील नगरपंचायती व ग्रामपातळीवर ग्रामपंचायती यांचाही सहभाग महत्त्वाचा असणार आहे. त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आपल्या स्तरावर उपक्रमाबाबत प्रभावीपणे जागृती करावी. जिल्ह्यातील आवश्यक घरांची संख्या लक्षात घेऊन स्थानिक विक्रेते व पुरवठादार यांच्याशी संपर्क करून तिरंगा झेंडा खरेदीबाबत नियोजन करावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील महिला बचतगटांना सुद्धा याबाबत प्रशिक्षण देवून तिरंगा झेंडा निर्मिती करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी उपक्रम राबविण्याबाबत २० जूनच्या शासन निर्णयातील कृती आराखड्यानुसार ग्रामपंचायती, आरोग्य रुग्णालये, रास्त भाव धान्य दुकाने, शाळा आणि महाविद्यालये, पोलिस यंत्रणा, राज्य परिवहन महामंडळ, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना अवगत केले.

azadi ka amrit mohotsav
नाशिक शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच; 3 वाहने लंपास

ग्रामीण भागात साडेसात लाख घरांवर फडकणार ‘तिरंगा’ : बनसोड

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या वेळी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची रूपरेषा विस्तृतपणे सांगत ग्रामीण भागात साडेसात लाख घरांवर तिरंगा फडकविण्याचे संकल्प आहे. शहरी भागातही नगरपालिका व महापालिकांना याबाबत उपाययोजना व जागृतीसाठी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शाळा व महाविद्यालय स्तरावर उपक्रमाबाबत चर्चासत्र, स्पर्धा, शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्यास राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने खरेदी करण्यासाठी विद्यार्थी नक्कीच सहभागी होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

azadi ka amrit mohotsav
पथविक्रेत्यांना कर्ज वाटपात नाशिक महापालिका अव्वल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.