Nashik : उष्णतेमुळे कांदा सडतोय अन्‌ शेतकरी रडतोय

Farmers & rotten onion
Farmers & rotten onionesakal
Updated on

कळवाडी (जि. नाशिक) : माळमाथ्यावर यावर्षी कांद्याचे उत्पादन वाढले (Onion Production Increased) असले तरी कवडीमोल दरामुळे साठवणून ठेवलेला कांदा सडू (Onion Rotten) लागला आहे. अशा शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवणे पसंत केले. परंतु, एप्रिल व मे महिन्यात वाढलेल्या विक्रमी तापमानामुळे चाळीतील कांदा आता सडू लागलाय. संपूर्ण चाळी बसून चालल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. (Harassment of onion grower farmers due Excessive Heat onion gets rotten Nashik News)

ज्या शेतकऱ्यांना साठवणूक करण्यास जागा नाही त्या शेतकऱ्यांना आपला कांदा कवडीमोल दराने विकावा लागला. सध्या तर ५० रुपये क्विंटल इतक्या अल्प दराने व्यापारी कांदा खरेदी करीत आहे. दरवाढ होईल, या आशेने साठवलेला कांदाही आता चाळीतील तापमान बिघडल्याने सडत चालला आहे. देवघट (ता. मालेगाव) येथील शेतकरी कैलास जगन्नाथ सोनवणे यांच्या चाळीतील काही दिवसांपूर्वी साठवलेला २५० क्विंटल कांदा चाळीतच सडून खराब झाला. महागडी बियाणे, खते, लागवड खर्च, काढणी खर्च, मशागत, चार महिने पाणी भरून मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा चाळीतच खराब झाल्याने केलेला दीड लाख रूपयांचा खर्च वाया गेला. शेतकऱ्याने आता कोणते पिक घ्यावे, हेच कळत नाही. शेती करून बळीराजा कर्जबाजारी होत आहे. वर्षभर जगायचे कसे, मुला- बाळांचे शिक्षण, दवाखाना, खरीपासाठी पैसे आणायचे कुठून, हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Farmers & rotten onion
नाशिक : कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडली

दरवर्षी शेतकरी किती संघर्ष करणार, हाच मोठा प्रश्‍न आहे. दिवस- रात्र रक्ताचे पाणी करून निसर्गाशी दोन हात करीत मजुरांच्या प्रश्‍नालाही तोंड देत मेहनतीने शेतीतून उत्पन्न काढणारा बळीराजा आता मात्र सर्वच प्रकारच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी त्रासून गेला आहे. यावर शासनाने काहीतरी शेतकरी हिताचा निर्णय घेऊन या संकटातून बाहेर काढण्याची आशा शेतकरी वर्ग करत आहे.

Farmers & rotten onion
ग्राहक प्रबोधन केंद्र ही अभिमानाची बाब; छगन भुजबळ

"मातीमोल दरामुळे झालेला खर्चही निघत नाही. घर चालवणे सुद्धा अवघड झाले असून, या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली कोणी देत नाही. सर्वच बाजूने त्यांची कोंडी होत आहे." - कैलास सोनवणे, शेतकरी, देवघट

"आधीच कांदा उत्पादनाने शेतकरी हतबल झाला होता. दोन वर्षे कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. दोन पैसे जास्त मिळावे शेतकरी मिळेल ते साधने वापरून कांदा साठवण करतो. त्यातून कांदा सडत आहेत. सरकारने विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य तो आधार देणे आवश्यक आहे." - शशिकांत भदाणे, शेतकरी, दापुरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.