Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार

married woman molestation
married woman molestationesakal
Updated on

नाशिक : मॅट्रेमोनिअल साईटवर अविवाहित (Unmarried) असल्याचे भासवून ४५ वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला नाशिकच्या विशेष पोक्सो (POCSO)

न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व तीन हजारांचा दंड ठोठावला आहे.(Harassment of the married by showing lure of marriage nashik crime news)

रविश प्रभाकर दुरगुडे (३५, रा. गावदेवी रोड, रतन भोजराज चाळ, श्रेयस सिनेमा हॉलमागे, घाटकोपर, मुंबई) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इंदिरानगर परिसरात 45 वर्षीय महिला मुलांसह राहत असताना ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०१८ या दरम्यान एबीपी वेडिंग या विवाहांशी संबंधित संकेतस्थळावर दुसरे स्थळ शोधण्यासाठी प्रोफाईल अपडेट केली होती.

त्यावेळी आरोपी दुरगुडे याने विवाहित असतांना एबीपी वेडींगवर अविवाहीत असल्याचे भासवून पीडितेशी संपर्क साधला. खोटे बोलून लग्नाचे अमिष दाखविले आणि दीपालीनगर, नाशिक व इंदिरानगर परिसरात नेऊन लैंगिक अत्याचार करुन फसवणूक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

married woman molestation
Nashik Crime News : 2 दुचाकी, 26 गोवंशसह साडेतीन लाखाचा ऐवज जप्त

गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहायक निरीक्षक पी. यू. शिंदे यांनी करुन आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याची सुनावणी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय तथा पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. खरात यांच्या समोर झाली. खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता एस. एस. गोरे यांनी कामकाज पाहिले.

यात परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून बलात्काराच्या व फसवणुकीच्या गुन्ह्यात सात वर्षांचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून एस. सी. भोये, अंमलदार पी.व्ही. पाटील यांनी पाठपुरावा केला.

married woman molestation
Nashik Crime News : चालकानेच लांबविला ट्रकमधील माल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.