Crime Against Girl
Crime Against Girlesakal

Crime: चॉकलेट, मॅगी घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्यास सक्तमजुरीची शिक्षा; अनेक मुलींशी गैरवर्तन

Published on

Nashik Crime : चेहेडी शिव परिसरातील खर्जुल मळ्यातील दुकानात चॉकलेट व मॅगी घेण्यासाठी गेलेल्या १० ते १७ वयोगटातील तिघा अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी ६० वर्षीय आरोपीला विशेेष पोक्सो न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. (Hard labor for molesting minor girls who went to buy chocolate Maggi Mistreatment of many girls nashik Crime)

अनिल माधवराव खरोटे (६०, रा. हरि संस्कृती, खर्जुल मळा, चेहेडी शिव, नाशिक) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खर्जुल मळ्यात आरोपी खरोटे याचे एकदंत जनरल स्टोअर्स या नावाचे दुकान आहे.

गेल्या २८ डिसेंबर २०२१ रोजी १० ते १७ वयोगटातील तीन अल्पवयीन मुली या आरोपीच्या दुकानात चॉकलेट व मॅगी घेण्यासाठी गेल्या असता, आरोपी खरोटे याने त्यांना दुकानात बोलावून घेत त्यांच्याशी अश्लिल वर्तन करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Crime Against Girl
Animal Crime: भटक्या श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, पोलिसांनी घेतलं ताब्यात

सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.आर. हांडोरे यांनी करीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

न्यायधीश एस.एस. खरात यांच्यासमोर खटला चालून सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अनिल बागले यांनी कामकाज पाहिले. यावेळी न्या. खरात यांनी परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार यांच्या पुराव्यास अनुसरून आरोपी खरोटे यास ५ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोंठावली.

पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस धनश्री हासे, अंमलदार सहायक उपनिरीक्षक पी.व्ही. पाटील यांनी पाठपुरावा केला.

Crime Against Girl
Mumbai Crime: महिलेच्या घरातुन दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.