Nashik News : डॉक्टरांचे स्टाफचे परिश्रम फळास आले; अवघ्या 61 दिवसात बाळाचे वजन 975 ग्रॅमने वाढले!

doctors and staff of hospital with baby nashik news
doctors and staff of hospital with baby nashik news esakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : अचानक काही घटना अशी घडते की त्याची पुसटशी कल्पनाही कोणाला नसते. (hard work of doctors and staff paid off In just 61 days baby weight increased by 975 grams nashik news)

आशा संकटकाळी मदत करणारा हा देवदूताप्रमाणेच सर्वांना हवाहवासा वाटतो तिथून प्रयत्नांचा काळ सुरू होतो या प्रयत्नांच्या परिश्रमावर डॉक्टरांना (Doctor) देव म्हटले जाते याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील महिलेला अचानक साडेसहा महिन्यांतच झालेल्या प्रसूतीमुळे अवघ्या ८४० ग्रॅम वजनाच बाळ जन्मास आल . त्यामुळे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. अशात डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून या बाळाला जीवदान दिले. ६१ दिवसांनी जेव्हा या बाळाला डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा वजन १ किलो ८१५ ग्रॅम म्हणजेच ९७५ ग्रॅमने वाढल्याचे दिसून आले.

सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील एक गर्भवती महिलेची प्रसूती सिन्नर शहरातील डॉक्टर पंकज नावंदर यांच्या हॉस्पिटलमध्ये झाली . साडेसहा महिन्यांतच तिने एका बाळाला जन्म दिला. अकाली प्रसूतीमुळे बाळाचे वजन खूपच कमी भरले. त्यामुळे अचानक रुग्णवाहिकेमध्ये बाळाला नाशिक त्यानंतर साफल्य रेनबो रुग्णालयात येथे हलविण्यात आले.

अवघे ८४० ग्रॅम वजन असल्याने बाळाची प्रकृती स्थिर ठेवण्याबरोबरच तो सुदृढ करण्याचे डॉक्टर अमोल मुरकुटे या डॉक्टरांसमोर आव्हान निर्माण झाले बालरोग तज्ञ डॉक्टर अमोल मुरकुटे यांनी अथक प्रयत्नाने बाळावर साफल्य हॉस्पिटल नाशिक येथे nicu मध्ये बाळाची ट्रिटमेंट उपचार केले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

doctors and staff of hospital with baby nashik news
Ayushman Bharat E Card : आयुष्यमान ई कार्ड वाटपात नाशिक राज्यात अव्वल! असे काढा इ कार्ड

जन्मताच बाळाला एन आय सी यु मध्ये ठेवावे लागल्याने डॉक्टर मुरकुटे यांनी त्यांच्या टीमने बाळावर विशेष लक्ष दिले आश्चर्य म्हणजे उपचारार्थ परिणाम पहिल्या दिवसापासूनच दिसून आल्याने बाळाचे वजन वाढण्याची प्रक्रिया वेगाने घडत गेली.

अवघ्या 61 दिवसात बाळाचे बदल 975 ग्रॅमने वाढले सध्या बाळाची प्रकृती उत्तम असून शुक्रवारी बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला यावेळी बाळाचे नातेवाईक डॉक्टर मुरकुटे यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

बाळाचे वजनात वाढ झाल्याने डॉक्टरांसह 61 दिवस बाळाचे दिवस रात्र देखरेख करीत अनेकांचे जीव बाळात रमलेला होता बाळाला घरी सोडताना आनंदाच्या अश्रूंनी भावनिक निरोप दिला बाळ हे सिन्नर तालुक्यातील असल्याने तसेच डॉक्टर मुरकुटे हेही सिन्नर तालुक्यात असल्याने हा एक योगायोगच म्हणावा लागेल डॉक्टरांच्या परिश्रमाने आज या बाळाला जीवदान मिळाल्याने सर्वांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.

"सदर बाळ सुखरूप घरी जाणे हा आधुनिक वैद्यक शास्त्रातला एक चमत्कारच आहे. ६१ दिवस काचेच्या पेटीत राहून बाळाला एकदाही जंतू संसर्ग झाला नाही ही NICU मधल्या सिस्टर्स च्या मातृवत प्रेमाचे द्योतक आहे. सोनवणे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती म्हणून आपण रुग्णालयातून सवलत तर दिलीच , याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून देखील मदत मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले."-डॉक्टर अमोल शिवाजी मुरकुटे बालरोग तज्ज्ञ

doctors and staff of hospital with baby nashik news
Nashik News: उपक्रमातून विकास साधणारी शेवाळेनगर शाळा; विद्यार्थ्यांमधील बदलांमुळे गावकरी शिक्षकांच्या मदतीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.