हरिहर गड १७ जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद; वनविभागाचा निर्णय

Harihar Fort Nashik Latest Marathi News
Harihar Fort Nashik Latest Marathi Newsesakal
Updated on

नाशिक : वनविभागाच्या (Forest Department) पश्चिम भाग क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरीहर गडावर (Harihar Fort) पावसाळ्यात (Monsoon) निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

अति गर्दीमुळे व पावसामुळे संभाव्य अपघात (Accident) होण्याची शक्यता असल्याने नाकारत येत नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हरीहर गड व परिसर १७ जुलैपर्यंत वनविभागाकडून पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. (Harihar Fort closed for tourists till July 17 Decision of Forest Department Nashik monsoon Latest Marathi News)

मागील काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे हे प्रवाही झाले आहेत. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे येथील निसर्ग बहरला आहे.

त्यामुळे पावसाळी पर्यटनासह परिसराला पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे. यातच तालुक्यातील हरिहर गडावर पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहे. मागील दोन शनिवार, रविवारी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती.

तेव्हापासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गडावरील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस आणि आठवड्याच्या शेवटी हरिहरगड परिसरात होत असलेली गर्दी लक्षात घेत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी येथील पर्यटनावर १७ जुलैपर्यंत वनविभागाकडून बंदी घालण्यात आली आहे.

Harihar Fort Nashik Latest Marathi News
नाशिकचे नगरसेवक शिंदेच्या संर्पकात; शिवसेनेत संशयाचा धुराळा

"पावसामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून हरिहर गडावर जाण्यासाठी पर्यटक यांना १७ जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मनाई करण्यात आली आहे. जर कोणी आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पर्यटकांनी वनविभागाला सहकार्य करावे." - पंकज गर्ग, उपवनसंरक्षक, नाशिक

Harihar Fort Nashik Latest Marathi News
नाशिक : पाऊसामुळे रस्त्यावर खड्डे च खड्डे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.