Nashik News : ध्येयपूर्तीच्या वेलीवरील हर्षदा कोमेजली; नाशिकच्या हर्षदाचा पुण्यात स्नानगृहात मृत्यू

Harshada Nerkar
Harshada Nerkaresakal
Updated on

Nashik News : सेमिस्टर संपले... जीवनात ठरविलेले उद्दिष्टपूर्ती आगामी दोन महिन्यांत होईल अन्‌ पाहिलेल्या स्वप्नांचीदेखील पूर्ती होऊन जीवनाच्या पुढील वाटचालीस सुरवात करेल, असा विश्‍वास वडील व बहीण- मेहुण्यांना देणारी हर्षदा नेरकर.

पतीच्या काळजीने दोन दिवसांनंतर माहेरी येईल...असे भावाला सांगत दुसऱ्या दिवशी दुपारी स्नानगृहात गेली, ती कायमची सर्वांना सोडून... (Harshada nerkar from Nashiks dies in bathroom in Pune news)

नाशिकची रहिवासी, कुशाग्र बुद्धीची हर्षदाचा अकाली मृत्यू साऱ्या परिवाराला चटका देऊन गेला आहे. १४ एप्रिलला स्नानगृहात गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळे हर्षदाला काळाने आपल्या कवेत घेतले. हर्षदाने के. के. अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई., एम. ई.(पॉवर सिस्टिम) केले.

एवढ्यावर न थांबता आपण काहीतरी वेगळे करावयास हवे म्हणून पीएच. डी. करण्याचा निर्णय घेतला. सूरत येथे पीएच.डी. करण्यासाठी प्रतिष्ठित नीट कॉलेजला पॉवर ग्रिड इन्टिग्रेशन या विभागावर काम सुरू केले.

संपूर्ण कोविडकाळात सुद्धा होस्टेलला राहून ‘पीएच. डी’ ची तपश्‍चर्या तिने अखंड सुरू ठेवली. बोलके व्यक्तिमत्त्व, इझी गोइंग नेचर, जिवाला जीव देणारी व्यक्ती म्हणून संपूर्ण होस्टेलच तिचे कुटुंब होते. पुढील दोन महिन्यांत तिच्या तपश्‍चर्येचे फळ मिळणार यासाठी ती आणि दोन्ही (नेरकर- शेंडे) कुटुंब तिच्या नावाप्रमाणे हर्षोल्हासित होते.

प्रतिष्ठित रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये तिची नियुक्ती होऊन केरळच्या इलेक्ट्रिकसिटीचे अवलोकनाचे काम तिच्यावर सुपूर्द केले होते. सेमिस्टर संपले म्हणून सुरतला जाऊन साहित्य आणण्यासाठी हर्षदा नाशिकला येणार होती. भाऊ डॉ. गौरव हा पुण्यात घेण्यासाठी गेला. मात्र, पतीची जेवणाची आबाळ होईल म्हणून दोन दिवसांनी येते, असे सांगितले.

भाऊ नाशिकला निघून आला. दुसऱ्या दिवशी पतीबरोबर चहा-नाश्‍ता केल्यानंतर स्नानासाठी गेली. त्यात लग्न आणि आता पीएच. डी. संपवून संसाराला सुरवात म्हणून एका नवीन घरात तिने तिचा संसार थाटायला आणि सजवायला सुरवात केली होती.

त्या घराच्या सुशोभीकरणासाठी ॲमेझॉनवरून मागविलेली साहित्य ती स्वीकारूच शकली नाही. कारण, काळाने अगोदरच घाव घातला. हर्षदाच्या मृत्यूचा कारणीमीमंसा करताना प्रथमदर्शनी जे दिसून आले आहे ते म्हणजे गॅस गिझर.

या संदर्भात नाशिकमधील हृदयरोग व मधुमेहतज्ज्ञ डॉ. पंकज राणे, हर्षदाचे मेहुणे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सचिन येवले अन्य तज्ज्ञांशी संवाद साधला असता, आपल्यातील अजून कोणा दुसऱ्याचा बळी जाऊन नये यासाठी काही काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे मत नोंदविले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Harshada Nerkar
Heatstroke Remedy : सावधगिरी हाच उष्माघातावरील उपाय! उन्‍हाच्‍या तडाख्यापासून अशी घ्या काळजी

काय घ्यावी काळजी

१. गॅसगळती होत आहे का, यावर लक्ष ठेवा. नैसर्गिक वायूचा सडलेल्या अंड्यासारखा वास येतो. या प्रकारचा वास येत असेल तर तत्काळ मदत घ्या.

२. गॅस गिझर जर बिघडलेला असेल तर नैसर्गिक वायूचं ज्वलन अर्धवट होतं. परिणामी कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू तयार होतो.

३. बंद जागेत गॅस गिझर लावू नका. महानगर आणि इतर अधिकृत गॅस गिझर विक्रेतेपण गॅस गिझर बाथरूममध्ये लावायला मनाई करतात. त्यांच्या मते तो मोकळ्या जागेत लावायला हवा, जेणेकरून तयार कार्बन मोनॉक्साईड वातावरणात मिसळून जाईल. पण सोयीच्या आणि घराच्या शोभिवंतपणाच्या दृष्टीने आपण तो बाथरूममध्येच लावून घेतो. परिणामी, घरातल्या माणसांच्या जिवावर बेतू शकतं.

४. गिझर जिथे आहे त्या जागी एक्झॉस्ट फॅन लावा. एक्झॉस्ट फॅनमुळे कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जित झालाच तर तो बाहेर फेकला जाईल.

५. गॅस गिझरचा सतत वापर करू नका. थोड्याथोड्या वेळासाठी गिझर बंद करून मग पुन्हा वापर करा. सततच्या वापरामुळे गिझर बिघडून स्फोटही होऊ शकतो.

६. गॅस गिझर वापरत असताना कधीच दरवाजा बंद करून बाथरूममध्ये थांबू नका. गरम पाणी बादलीत पूर्ण भरून घेतल्यानंतरच काही वेळाने आत जा. तोपर्यंत बाहेरच थांबावे.

Harshada Nerkar
Positive News : अतिगंभीर अवस्थेतील महिलेस ‘सिव्हिल’मध्ये जीवदान! वैद्यकीय पथकाची मेहनत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()