Hartalika Vrat : गणेश चतुर्थीच्या आदल्यादिवशी म्हणजे, भाद्रपद शुद्ध तृतीयेला सोमवारी (ता. १८) हरितालिकेचे व्रत केले जाईल. भगवान शिवशंभू यांच्या प्राप्तीसाठी माता पार्वतीने व्रत केल्याची अख्यायिका असून, कुमारिका, सुवासिनी हे व्रत करतात.
नाशिकमधील नवविवाहित तरुणी विवाहाच्या आधीपासून हे व्रत करत असून, उच्चशिक्षितांमध्ये हरितालिकेच्या पूजाविधीचा उत्साह कायम आहे. (hartalika vrat from before marriage Enthusiasm for puja rituals among highly educated of Nashik)
कुमारिका चांगला जोडीदार मिळावा म्हणून सुवासिनी पतीला दीर्घायुष्य म्हणून व्रत करतात. व्रताचा एक भाग म्हणून काही महिला निर्जली उपवास करतात. ते शक्य नसल्यास फळे व गोड पदार्थ खावून उपवास केला जातो.
सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत अनेक महिला अन्न वर्ज्य करतात. घराची साफसफाई करून पहाटे लवकर उठून पूजा केली जाते.
पूजाविधी
स्वच्छ जागेवर चौरंग ठेवून केळीच्या खांब चारही बाजूने बांधले जातात. चौरंगावर शंकर आणि पार्वतीची स्थापना केली जाते. त्यानंतर धूप, दीप-नैवेद्य दाखवून पत्री, फुलांद्वारे पूजन केले जाते.
पत्रीमध्ये जाई, शेवंती, पारिजातक, तुळशी, रूई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने आदींचा समावेश असतो. पूजेनंतर काही जणी रात्रभर जागरण करतात. दरम्यान, व्रताची अख्यायिका सांगितली जाते.
ती अशी : पार्वतीला भगवान शंकराशी विवाह करावयाचा होता. त्यासाठी मैत्रिणी पार्वती मातेला जंगलात घेऊन गेल्या. त्याठिकाणी पार्वतीने शंकराच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली. मनोभावे हरितालिकेची पूजा केली. त्यातून त्यांना भगवान शंकराची प्राप्ती झाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
हरितालिका पूजनावेळचा मंत्र
या देवी सर्व भूतेषु मां गौरी रूपेण संस्थिता ।
सिंदूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम ।
शुभद कामद चैव सिंदूरं प्रतिगृह्यताम ।।
देहि सौभाग्यं आरोग्यं देहि मे परम सुखम ।
"भगवान शंकराला आवडणारी विविध प्रकारची फुले व पत्री या पूजेसाठी वापरतात. ज्यात बेल, शमी, धोतरा, रूई, आंब्याचा मोहोर व पांढऱ्या फुलांचे महत्त्व आहे. महादेवाला आवडणाऱ्या सर्व पत्री-फुले यांचे गुणधर्म आयुर्वेदात सांगितले आहेत. ते नैसर्गिकरित्या आरोग्यवर्धनक आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केव्हाही हे पूजन करता येते."
- पंडित नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक
"हरितालिकेचे व्रत केल्याने कुमारिकांना पती मिळतो. पतीला दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून विवाहिता हे व्रत करतात. मी हे व्रत माझ्या लग्नाच्या आधीपासून म्हणजे दहा वर्षांपासून करते."
- प्रियंका गिते, खुटवडनगर
"चांगल्या पतीच्या प्राप्तीसाठी कुमारिका, तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहिता हे व्रत करतात. हल्लीच्या उच्चशिक्षित तरुणींना या व्रताबाबत मोठी उत्सुकता दिसून येते."
- सायली शेटे, गोविंदनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.