नाशिक : शहरातील अपघात टाळण्यासाठी वृक्षतोड करण्याविरोधात नागरिकांनी चळवळ सुरु केली. ही वृक्षतोड थांबून पर्यावरण संवर्धन व्हावे, यासाठी पर्यावरणाचा संदेश देणारी नाशिकमधून सुरू झालेली ही ‘हॅशटॅग चिपको’ (hashtag chipako) चळवळ आता दुसऱ्या राज्यात पोहोचली आहे. या चळवळीने गोवा राज्यातही या जोर धरला आहे.
उत्तुंग झेप फाउंडेशनचे संस्थापक रोहन देशपांडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने ८ मे २०१५ रोजी स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र, त्या पर्यावरणाचे संवर्धन करताना त्या सूचनांची पायमल्ली होत आहे. नाशिकसह राज्यात सर्वत्र अवैध वृक्षतोड करण्यात येत आहे. सध्या नाशिकमधील २९ वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना ‘हॅशटॅग चिपको’ नाशिक चळवळ त्याविरोधात ठामपणे उभी राहिली. यामुळे वृक्ष तोडीवर नियंत्रण येईल. जनजागृतीमुळे चळवळीला व्यापक स्वरूप आले आहे. गोवा राज्यातून चळवळीला पाठिंबा मिळत आहे. हॅशटॅग चळवळीच्या नाशिक, राज्य व गोवा अशा तीन स्वतंत्र मध्यवर्ती समित्या तयार केल्या जाणार आहेत. प्रत्येक समितीत १० पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासू कार्यकर्ते यांचा समावेश असेल.
(hashtag chipako movement started in nashik has reached another state)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.