नाशिक : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे आणि गैरकारभाराचे प्रकरण नुकतेच पार पडलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीतून पोचले होते. याच संदर्भात अपर पोलिस महासंचालकांमार्फत चौकशी सुरू असताना, यामध्ये अंबड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे यांचाही संबंध निष्पन्न झाल्याने, त्यांची तत्काळ गंगापूर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.
विशेषत: जागेवरच त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश अपर पोलिस महासंचालकांनी दिले होते. दरम्यान, अंबडचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस महानिरीक्षक भगीरथ देशमुख यांचीही चौकशी अंतिम टप्प्यात असून, त्यांचा जबाब नोंद होऊन सदरचा गोपनीय अहवाल गृह विभागाला सादर केला जाणार आहे. (Hasty transfer of assistant inspector of Ambad ganesh shinde Action of Additional Director General nashik news)
अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके हे गेल्या १८ जानेवारीपासून नाशिकमध्ये चौकशीसाठी आले आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांसंदर्भात आलेल्या तक्रारींसह अवैध व्यवहारांची चौकशी अपर महासंचालक गेल्या दोन आठवड्यांपासून कसून चौकशी करीत आहेत.
याच चौकशीदरम्यान अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्याबाबतही काही तक्रारी अपर पोलिस महासंचालकांसमोर आल्याचे समजते.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
त्यावरून अपर महासंचालकांना तत्काळ त्यांची प्रशासकीय कारणास्तव बदलीचे आदेश दिले. त्यानुसार, शिंदे यांना गेल्या शुक्रवारी (ता. २४) तत्काळ कार्यमुक्त करीत गंगापूर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
देशमुख यांचा जबाब नोंद
अंबडचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांची सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी जबाब नोंदवून घेतला आहे. सदरचा जबाब आणि अपर पोलिस महासंचालकांनी केलेल्या चौकशीचा गोपनीय अहवाल गृहविभागाला सादर केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.