Nashik News: विभाग प्रमुखांना नागरिकांना वेळ देणे बंधनकारक; NMC आयुक्त डॉ. करंजकर ॲक्शन मोडमध्ये

Dr. Ashok Karanjkar
Dr. Ashok Karanjkaresakal
Updated on

Nashik News : काही प्रमाणात शिथिलता आलेल्या प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावण्याचा तसेच नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर अॅक्शन मोडमध्ये आले आहे.

आयुक्तांनी आठवड्यातील तीन दिवस तीन ते पाच ही वेळ नागरिकांसाठी राखून ठेवणे विभागप्रमुखांना बंधनकारक केले आहे. तक्रारींचे निराकरण होत नसल्याचे थेट त्यांच्याकडे पाठविण्याच्या सूचना दिल्याने विभागप्रमुखांचे धाबे दणाणले आहे. (Head of department obliged to give time to citizens NMC Commissioner Dr Karanjkar in action mode Nashik News)

प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधी नाही. त्यात याच कालावधीमध्ये महापालिकेला चौथे आयुक्त मिळाले. उपायुक्त पदावर नवीन अधिकारी हजर झाले, तर बदल्या व चांगले टेबल मिळविण्यासाठी अभियंत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे.

अशा परिस्थितीत नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांकडून ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने तक्रारी दाखल होतात. परंतु त्याची दखल घेतली जात नाही. गेल्या काही दिवसात तक्रारी साचण्याचे प्रकार वाढले.

विभागीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी आहे की नाही, अशी स्थिती आहे. विभागीय अधिकारी व अभियंते फिल्डवर जाण्याचे सांगून गायब असतात. बायोमेट्रीक हजेरी लावण्यापुरते अधिकारी व कर्मचारी हजर असतात.

अधिकाऱ्यांकडून चालढकल केली जात आहे. विभागीय कार्यालयाकडून तक्रारींचा निपटारा होत नसल्याने आयुक्त कार्यालयाकडे तक्रारींचा ओघ वाढला.

या सर्वांचा परिणाम नागरिकांची ओरड वाढल्याची बाब आयुक्त करंजकर यांच्याकडे तक्रार स्वरूपात आल्याने आयुक्तांनी तातडीने दखल घेत कामकाजाला शिस्त लावण्यासाठी पावले उचलली आहेत.

Dr. Ashok Karanjkar
NMC News : मनपाचे अर्थकारण 25 टक्क्यांच्या वाट्याने बिघडणार; सिंहस्थ आराखड्यावरून पेच

त्यात विभागीय अधिकाऱ्यांसह विभाग प्रमुखांसाठी नियमावली आखून दिली असून त्यात आठ दिवसातून तीन दिवस दुपारी तीन ते पाच या वेळेत नागरिकांच्या तक्रारींसाठी नियुक्तीच्या ठिकाणी तसेच मुख्यालयात थांबणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

आयुक्तांच्या सूचना

- नागरिकांच्या तक्रारी स्थानिक पातळीवर सोडविणे.

- आयुक्त कार्यालयात तक्रार आल्यास विभाग जबाबदार.

- विभागीय स्तरावर तक्रारी सोडविणे बंधनकारक.

- तक्रारीचे समाधान न झाल्यास अतिरिक्त आयुक्तांकडे.

- अतिरिक्त आयुक्तांकडून समाधान न झाल्यास आयुक्तांकडे निपटारा.

Dr. Ashok Karanjkar
NMC News : मलेरिया विभागाचे वराती मागून घोडे; अनामत रक्कमेतून ग्रॅच्युइटी, भविष्यनिर्वाह निधी कापणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.