Health Care : वेळीच ओळखा मानसिक थकवा! बदलत्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम

fatigue
fatigueesakal
Updated on

नाशिक : इमारतीचा जिना चढताना दम लागणे, बोलताना धाप लागणे, जेवण केल्यानंतरही वा कोणतेही काम न करताही थकवा येणे अशी लक्षणे तुम्हाला जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे तुम्हाला पुन्हा एका आनंदी जीवन जगण्यासाठी पहिला इशारा देणारी संधी आहे, असे समजा.

कारण हा थकवा शारीरिक नाही तर मानसिक (बर्नआउट सिड्रोंम) आहे हे वेळीच ओळखून प्रत्येकाने सकारात्मक जीवनशैली आत्मसात केली, तर मानसिक ऊर्जा निर्माण होऊन आनंदी जीवन जगता येऊ शकेल. यासाठी फार काही करण्याची गरज नसून प्रत्येकाने स्वत:साठी वेळ काढला पाहिजे. स्वत:साठी काही क्षण जगता आले पाहिजे. (Health Care Recognize mental fatigue in time Adverse effect of changing lifestyle Nashik Lifestyle news)

अलीकडे प्रत्येक क्षेत्रात, स्तरावर स्पर्धा वाढली आहे. यात प्रत्येक जण स्वत:ला विसरत आहे. स्वत:चे जगणे विसरत आहे. तो जगण्याचा आनंद घेऊ शकत नाही. परिणामी अकाली व्याधी जडण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे वेळीच जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास अकाली येणारा मानसिक थकवा टाळता येऊ शकतो. त्यासाठी नकारात्मक विचारसरणी टाळावी. वाढता ताणतणाव टाळावा, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वत:साठी काही वेळ दिला तरीही वारंवार येणाऱ्या मानसिक थकव्यापासून आपल्याला सुटका मिळू शकते.

मोबाईलचा दूरगामी परिणाम

मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. संवाद-संपर्काच्या पलीकडे मोबाईलचा वापर होऊ लागल्याने त्याचा मानवाच्या जीवनशैलीवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. रात्री उशिरापर्यंत, अगदी झोप लागेपर्यंत मोबाईल पाहण्याने शारीरिक ताण वाढतो. मनावरही त्याचा परिणाम होतो. परिणामी मानसिक थकव्याचे एक मुख्य कारणही मोबाईलचा अतिरेकी वापर हेही आहे.

fatigue
Nashik News : नाशिकमधील दिव्यांगांच्या शाळांमधील शिक्षकांचे दिवाळीपासून वेतन थकीत

मानसिक थकव्याची कारणे

- कामाचा अतिरिक्त ताणतणाव

- असंतुलित, अवेळी आहार

- अपुरी झोप

- मोबाईलचा अतिरेकी वापर

- सतत नकारात्मक विचार

- व्यायामाचा अभाव

- स्वत:च्या मनोविश्‍वात राहणे

मानसिक थकवा म्हणजे...

- कोणतेही कारण नसताना उत्साह नसणे

- सतत थकल्यासारखे वाटणे

- विनाकारण धडधड वाटणे

- काहीही करण्याची इच्छा नसणे

- सतत नकारात्मक विचार करणे

- मानसिक खच्चीकरण झाल्यासारखी वर्तणूक

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

fatigue
Bollywood: अनुराग कश्यप V/S पायल घोष...केसनं उडवली होती बॉलीवूडची झोप

स्वत:साठीही जगले पाहिजे!

जगण्याचे मूलभूत तत्त्व म्हणजे स्वत:साठी जगा आणि आनंदी जगा. त्यासाठी प्रत्येकाने दिवसातील किमान २० ते ३० मिनिटे काढून ते स्वत:च्या आनंदासाठी खर्च करा. स्वत:च्या मनाचा स्वीकार करणे अत्यंत गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगण्याचा प्रयत्न केल्यास आनंद आयुष्य जगता येऊ शकते आणि मानसिक थकवाही घालविता येतो.

"मानसिक खच्चीकरण झाले, की त्याचा थेट परिणाम आयुष्यावर होतो. आनंदी आयुष्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, सकारात्मक विचारसरणी आणि स्वत:साठी वेळ याकडे लक्ष दिले तरी प्रत्येक व्यक्ती आनंदी राहू शकेल." - डॉ. स्वाती चव्हाण, मानसोपचारतज्ज्ञ

"मानसिक थकव्यावर मात करायची असेल, तर स्वत:साठी वेळ दिला पाहिजे. दिवसाला २० ते ३० मिनिटे, आठवड्याला एक-दोन तास वा महिन्यातून एखादा दिवस स्वत:साठी दिला पाहिजे."

- डॉ. नीलेश जेजूरकर, मानसोपचारतज्ज्ञ

fatigue
Golds 2020 Scheme : रतनलाल सी. बाफना ज्वेलस्‌मध्ये सोने खरेदीचे सर्वात स्वस्त 20 दिवस!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.