NMC News : घंटागाडी ठेकेदारांवर आरोग्य विभाग उदार! 4 महिन्यात अवघा 16 लाखांचा दंड

NMC News
NMC Newsesakal
Updated on

NMC News : केरकचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी असताना त्यांच्यावर दंडदेखील तेवढ्याच प्रमाणात होणे अपेक्षित आहे.

करोडो रुपयांचा दंड होणे अपेक्षित असताना तेथे चार महिन्यात अवघे १६ लाख रुपयांचा दंड ठेकेदारांवर आकारून आरोग्य विभागाकडून स्वतःची पाठ थोपटून घेतली जात आहे. विशेष म्हणजे पंचवटी व सातपूर विभागातील ठेकेदारावरील कारवाई ‘डोळ्यात’ भरणारी आहे. (Health department eglect on ghantagadi contractors 16 lakh fine in 4 months only NMC nashik news)


महापालिका आरोग्य विभागाकडून डिसेंबर २०२३ पासून केरकचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीचा ठेका देण्यात आला आहे. सहा विभागात एकूण ३९७ घंटागाड्या चालविल्या जातात. या घंटागाडीच्या माध्यमातून सहा विभागातून केरकचरा संकलन करून पाथर्डी फाटा येथील कचरा डेपोत टाकला जातो.

तेथील पुढे खत प्रकल्पात कचरा टाकून त्यातून खत तयार केले जाते. घंटागाडी हा नाशिकचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. प्रथम नाशिकमध्ये प्रकल्प राबविल्यानंतर देशभरात त्याची अंमलबजावणी झाली.

मात्र, नाशिकमध्ये चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी होत असल्याने दरवर्षी घंटागाडी प्रकल्प वादात सापडतो. या वेळी घंटागाडी ठेक्याची किंमत ३५४ कोटी रुपयांवर पोचल्याने आरोग्य विभागाच्या प्रस्तावावर शंका व्यक्त केली गेली.

त्यानंतर येणकेण प्रकारे घंटागाडीचा ठेका काढण्यात आला. घंटागाडीचा ठेका देताना करारातील अटी व शर्तीनुसार काम देण्यात आले. त्यात घंटागाडी वेळेवर पोचणे, नियोजित मार्गावरच धावणे, कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करणे यासारख्या महत्त्वाच्या अटी होत्या.

मात्र अटींचे सर्रास उल्लंघन झाले. मागील चार महिन्यात ठेकेदारांकडून अटी व शर्तींचे उल्लंघन केले गेले. आरोग्य विभागाकडून मात्र ठेकेदारांना पाठीशी घातले गेले . वास्तविक करोडो रुपयांचा दंड करून घंटागाडी ठेकेदारांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
NMC News : निश्चित संरेषेबाहेर रस्ते खोदणे पडले महाग! महापालिकेकडून स्मार्टसिटी कंपनीची कामे रद्द

मात्र अवघ्या चार महिन्यात फक्त १६ लाख रुपये दंड करून आरोग्य विभागाकडून स्वतःची पाठ थोपटून घेतली जात आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने संबंधित ठेकेदारांकडून गेल्या चार महिन्यात १५ लाख ९४ हजार ७९९ रुपयांचा दंड वसुल केला आहे.

विभाग दंडाची रक्कम (रुपये)

पंचवटी ३,२३,४००
सातपूर ४,३५,६५०
सिडको ४,१२,०४९
नाशिक पश्चिम ३,२२,९५०
नाशिक पूर्व ४७,०००
नाशिक रोड ५३,७५०

NMC News
Nashik: जमावाकडून त्र्यंबकेश्र्वर मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न, नेमका प्रकार काय? सविस्तर जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.