Nashik News: ‘सिव्हिल’च्या अंगणातच ‘आरोग्या’ची वाताहत! उघड्या गटारी, ढापे अन्‌ जागोजागी डबकी, चिखल

Mud Pond
Mud Pondesakal
Updated on

Nashik News : उघड्या गटारी, चेंबरचे तुटलेले ढापे, पावसामुळे जागोजागी साचलेले पाण्याचे डबके, चिखल, मोकळ्या जागेत वाढलेले गाजर गवत हे चित्र शहरातील झोपडपट्टीसदृश निवासी भागातील नाही.

तर, ज्या ठिकाणी आरोग्याची काळजी घेतली जाते, उपचार केले जातात त्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील आहे. आरोग्य विभागाकडूनच स्वच्छतेचा संदेश देताना त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चही केला जातो.

परंतु जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात ‘आरोग्या’ ची वाताहत झालेली असताना, अशा वातावरणात रुग्णांवर उपचार होत असल्याचे आश्‍चर्य व्यक्त होते आहे. (health department in courtyard of Civil hospital Open drains sluices and puddles at places Nashik News)

जिल्हा शासकीय रुग्णालयात शहरातूनच नव्हे तर, जिल्ह्यातून दररोज शेकडो रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येतात. त्यातच सध्या पावसाचे दिवस असल्याने याच काळात डासांचा प्रादूर्भाव होऊन संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढत असतात.

त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून स्वच्छतेचा संदेश देताना रहिवासी भागात कुठेही घाण साठणार नाही, पाण्याची डबके तयार होणार नाहीत, गटारांवरील ढापे बंद करावेत, अशा सूचना दिली जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही केला जातो.

मात्र, याउलट चित्र जिल्हा शासकीय रुग्णालयात दिसून येते. रुग्णालयाच्या आवारातील गटारी उघड्याच आहे. अनेक ठिकाणी गटारावरील चेंबरचे ढापे तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी चेंबरवर ढापेच नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mud Pond
Nashik News: औद्योगिक क्षेत्रातील कर वर्गवारी प्रस्ताव शासनाला सादर; पूर्वीप्रमाणे कर नियोजन करण्याचा प्रस्ताव

रुग्णालयाच्या इमारतींच्या प्लंबिंगच्या पाइपलाइन लिकेज झालेल्या आहेत. त्यामुळे घाण पाणी जमिनीवर साचून दुर्गंधी सुटते. त्याचप्रमाणे, सध्या पावसाचे दिवस असल्याने जागोजागी पाण्याच्या डबके झालेले आहेत.

अनेक ठिकाणी चिखलही आहे. या साऱ्यांमुळे दुर्गंधी पसरते तर आहेच, शिवाय डासांचा प्रादूर्भाव होऊन त्यामुळे रुग्णांना त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे रुग्णालय प्रशासनाकडून सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे.

तर, ज्या विभागावर दुरुस्तीची जबाबदारी आहे त्या सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका नेहमीच उदासीन राहिलेली आहे. त्यामुळे आरोग्याच्या ठिकाणीच अस्वच्छता दिसून येत असल्याने रुग्ण बरे होणार तरी कसे, असा प्रश्‍न जागरूक नागरिकांना पडतो आहे.

Mud Pond
Monsoon: पावसाअभावी खरीप पेरण्या गेल्या वर्षीपेक्षा 10 टक्क्यांनी कमी; 1 हजार 300 गावे- वाड्या तहानलेल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.