हेल्थ इज वेल्थ : हेल्मेट वापरा, सुंदर चेहरा-जबडा वाचवा!

use helmet
use helmetesakal
Updated on

लेखक : डॉ. विशाल जाधव

आधुनिकीकरणाच्या या युगात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाचा व्याप वाढला आहे. प्रत्येकाला प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या पातळ्यांवर जीवन जगण्याची लढाई लढावी लागत आहे.

आधुनिकीकरणात कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. ही कामे करण्यासाठी माणूस वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करू लागला. या सर्व यंत्रांमधील एक महत्त्वाचे यंत्र म्हणजे अर्थातच अतिवेगाने चालवली जाणारी दुचाकी वाहने. (Health is Wealth Use helmet save beautiful face jaw article by dr vishal jadhav nashik newे)

मध्यमवर्गीय व्यक्ती आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी दुचाकीचा सर्रास वापर करताना दिसतो. तरुणांमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारच्या बाइक, स्पोर्ट्स बाइक वापरण्याचा ट्रेन्डच आलेला दिसून येतो. मात्र दुचाकी वाहनांचा वापर करताना आपले शरीर अमूल्य असल्याचा या पिढीला विसर पडला आहे.

अतिवेगाने बाइक चालवताना हेल्मेट वापरण्याची सवय अजूनही अनेकांना झालेली नाही, हे रस्त्यावरून जाताना लगेच लक्षात येते. भरधाव वेगामुळे अपघात होऊन प्रसंगी मृत्यूसुद्धा येऊ शकतो.

परंतु जर हेल्मेट वापरण्याची सवय असेल, तर गंभीर अपघातातसुद्धा बचाव होऊ शकतो. बदलत्या काळानुसार जीवनशैलीत आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतो. पण जीवन सर्वांत महत्त्वाचे असून, त्यावर आपले अस्तित्व आहे, हे विसरता कामा नये.

मानवी शरीर हे अत्यंत सुंदर आहे. शरीरातील प्रत्येक अवयव दुसऱ्या अवयवाशी जोडला गेला आहे. सर्व अवयवांत चेहरा, जबडा, डोळे, कान, मेंदू हे अवयव अत्यंत नाजूक आणि सर्वाधिक महत्त्वाचे आहेत.

त्यामुळे त्यात थोडा जरी बिघाड झाला किंवा नैसर्गिक रचनेत फरक पडला, तरी आपलं आयुष्यभराचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. त्यासाठी जबड्याची रचना समजून घ्यायवा हवी.

(MAXILLA) म्हणजेच वरचा जबडा हा कमी घनता असलेल्या हाडांचा असतो. वरचा जबडा कवटीशी थेट जोडलेला असतो. जबड्यातील खोबणीत दात सुव्यवस्थितरीत्या असतात. जबडा हा यू, व्ही किंवा स्क्वेअर अशा वेगवेगळ्या आकारांचा असतो.

दुचाकी अपघातात मार लागल्यास वरच्या जबड्याचे लवचिक हाड असल्याने त्याच्या मूळ आकारात बदल होऊन माराचा आघात कमी होतो. त्यातील हाड लवचिक असल्याने मेंदूला इजा पोचत नाही. अपघातात वरच्या जबड्याला मार बसल्यास वरचा ओठ व समोरच्या दातांना इजा होते.

use helmet
Women Health Tips: निरोगी राहण्यासाठी प्रत्येक महिलेने या 5 गोष्टींचं सेवन करा

त्यातून संसर्ग वाढला, तर तो प्रत्यक्ष मेंदूपर्यंत पसरू शकतो. खालचा जबडा (MANDIBLE) या हाडाचा आकार घोड्याचा पायाच्या पंज्यासारखा असतो. खालचा जबडा हा RAMUS व MAIN BODY MANDIBLE यामध्ये विभागला जातो.

RAMUS या भागाचे CONDYLE (गोलाकार भाग) हा डोक्याच्या कवटीशी (TEMPORAL BONE) जोडलेला असतो. या जोडाला/सांध्याला TEMPORAL MANDULAR JOINT असे म्हणतात. या जॉइंटमुळे खालच्या जबड्याची हालचाल वर-खाली व डावी-उजवीकडे करणे शक्य होते. तसेच या जॉइंटमुळे दातांनी चर्वण करणे सोपे होते.

RAMUS च्या आतील बाजूने INFERIOR ALVEOTAR NERVE प्रवेश करून मुख्य जबड्याच्या हाडाच्या बाहेरच्या बाजूने दुसऱ्या उपदाढेच्या खाली MENTAL FORMEN मधून बाहेर येते. BODY OF MANDIBLE मुख्य खालच्या जबड्याचे हाड डावी व उजवी BODY OF MANDIBLE हा RAMUS शी काटकोनात जोडलेला असतो.

डावे व उजवे मुख्य हाड मध्यभागी जोडलेले असतात. मुख्य जबड्याच्या वरच्या बाजूने दातांसाठी खोबणी (SUCKET) असतात. त्यामध्ये दात स्थित असतात.

जेव्हा दुचाकीवर असताना अपघात होतो, तेव्हा हनुवटीवर आघात होतो. अपघाताच्या तीव्रतेवर होणारे परिणाम अवलंबून असतात. जेव्हा आघात हा कमी प्रमाणात असतो. तेव्हा फक्त SYMPHOSIS FRACTURE होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर SUB CONDYLAR FRACTURE होऊ शकते.

CONDYLAR हे नाजूक हाड असते. हाड तुटल्यामुळे DIRECT मेंदूला होणारी इजा टाळली जाते. त्यामुळे CANDYLAR FRACTURE ही एकप्रकारे मेंदूला होणारी इजा वाचवण्यासाठी नैसर्गिक प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे, असेच म्हणता येईल.

जर डाव्या किंवा उजव्या बाजूने जर अपघातात आघात झाला तर मुख्य खालचा जबडा व वरच्या जबड्याची ZYGOMATIC PROCESS तुटू शकते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

use helmet
Women Health Tips: निरोगी राहण्यासाठी प्रत्येक महिलेने या 5 गोष्टींचं सेवन करा

हेल्मेट वापरण्याची गरज

हेल्मेटची रचना बघता जबडा वाचण्यासाठीची उपाययोजना लगेच लक्षात येते. हेल्मेटचा आकारदेखील खालच्या, वरच्या जबड्याच्या आकाराप्रमाणे असतो. आतल्या बाजूचे कुशन जबड्याला किंवा जबड्यावरील मांसपेशी, त्वचेला इजा पोहोचवत नाही.

त्यामुळे हेल्मेट वापरणे हे सुंदर जबडा /चेहरा यांचे संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या हाडामध्ये आतले व बाहेरचे CORDICLE PLATE असते व मध्ये SPONGY BONE असते. त्याच प्रमाणे हेल्मेटमध्येसुद्धा आतले व बाहेरचे मजबूत आवरण असते.

SPONGY MEDIUM असते. जे SHOCK ABSORPTION चे काम करते. त्यामुळे हेल्मेटच्या वापरामुळे जबडा, दात व चेहरा आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे आपला मेंदूदेखील सुरक्षित राहून जीवदान मिळते.

हेल्मेट न वापरण्याचे परिणाम

- जेव्हा अपघातात आपला जबडा तुटतो, तेव्हा आपल्या दातांची रचना बदलते.

- चेहऱ्यावर जखमांचे व्रण चेहरा बदलून टाकतात.

- शस्त्रक्रियेमुळे व्यवस्थित जेवता येत नाही, नंतरसुद्धा आपल्याला तीन ते चार महिने पूर्ववत होण्यास लागतात.

- व्यवस्थित ब्रश न करता आल्यामुळे तोंडाची दुर्गंधी येऊ शकते.

- अपघाताची तीव्रता अधिक असल्यास समोरचे दात बाहेर निघून येतात व पर्यायाने नवीन नकली दात बसवण्याची वेळ येऊ शकते.

- CRUSH INJURY मध्ये जबड्याचे प्रत्यारोपण करण्याचीसुद्धा वेळ येऊ शकते.

त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी, पचन व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक अर्थात, दात, तोंड अबाधित ठेवण्यासाठी वेगावर नियंत्रण आणि हेल्मेटचा वापर अतिशय गरजेचा आहे. जबड्याला गंभीर आघात झाल्यानंतर, केल्यानंतरसुद्धा पूर्ववत होण्यास साधारणतः तीन ते चार महिने लागतात.

नशा करून वाहन चालवणे टाळा

तरुण हे कुटुंबाचे व तसेच देशाचा जीडीपी वाढवणारी शक्ती असते. त्यामुळे स्वतःच्या व कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी तरुणांनी आरोग्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे.

नियमित व्यायाम, योग करून मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावे. तंत्रज्ञान व भारतीय संस्कृती यांचा समतोल साधला जाईल असेच वैयक्तिक व सामाजिक जीवन असावे, असा सतत प्रयत्न करावा.

(लेखक ‘फेलो इन ओरल इनप्लांट’ असून, शासकीय रुग्णालयात दंतरोगतज्ज्ञ आहेत)

use helmet
Health Tips : वजन कमी करण्यासाठी उपाशी राहत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.