Nashik : पाणीगळतीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Water gushing everywhere from faulty valves in Kalanagar Chowk.
Water gushing everywhere from faulty valves in Kalanagar Chowk.esakal
Updated on

इंदिरानगर (जि. नाशिक) : येथील कलानगर चौकात असणाऱ्या पाण्याच्या व्हॉल्व्हची गळती रोखण्यात संबंधित यंत्रणेला सातत्याने अपयश येत असल्याने या ठिकाणी आता गटारीचे स्वरूप निर्माण झाले असून, दररोज होणाऱ्या पाणीगळतीमुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

अनेक वेळा या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाने दुरुस्ती केली. मात्र, दुरुस्ती केल्यानंतर दोन ते तीन दिवसांत परत एकदा येथून पाणीगळती सुरू होते. त्यामुळे पाणी तेथे साचून या ठिकाणाला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. (Health of citizens in danger due to water leakage nashik Latest Marathi News)

विशेष म्हणजे हे पाणी त्याच ठिकाणी जिरून खालून जाणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये जात असल्याची शंका नागरिक व्यक्त करीत आहेत. असे असेल, तर मग ऐन पावसाळ्याच्या दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांनाही नागरिकांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या ठिकाणी संपूर्णपणे खोदकाम करून नेमकी अडचण कुठे आहे आणि गळती कुठे आहे, याचा शोध घेऊन कायमस्वरूपी ही गळती रोखण्याची मागणी आता सर्वच स्तरातून केली जात आहे.

"या ठिकाणी दुरुस्तीनंतर पुन्हा गळती सुरू होते. त्यामुळे ही समस्या आहे तशीच आहे. विशेषत: महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती गेल्यानंतर संबंधित यंत्रणाही सुस्त झाल्याचे निदर्शनास येत आहे. या समस्येचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे."

-आकाश खोडे, सामाजिक कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.