पंचवटी (जि. नाशिक) : दाट लोकवस्तीच्या भाग, सर्वत्र पसरलेली अस्वच्छता, साठणारे पाणी, रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी, परिसरात सुटलेली दुर्गंधी अशा परिस्थितीने फुलेनगर परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. अशा अवस्थेत येथे लोक राहत आहेत. या परिसरातील स्वच्छता होत नसल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. (health of residents of Phulenagar is in danger due to unsanitary conditions Nashik News)
पंचवटीतील फुलेनगर परिसर हा नेहमी दुर्लक्षित राहिलेला झोपडपट्टीचा भाग आहे. येथे मजुरी करणे, जडीबुटी आणि विविध वस्तूंची विक्री करणारे राहतात. काहींना राहण्याची व्यवस्था असली तरी कुटुंब वाढलेल्यानंतर जागेची कमतरता भासत असल्याने घराजवळच्या भागात बांबू, पत्रे टाकून झोपड्या उभारण्यात येतात. त्यात कसेबसे दाटीने राहण्याची त्यांच्यावर वेळ येते. त्यामुळे बहुतेक वेळी ते रस्त्यावरच बसलेला दिसतात.
येथील रहिवासी रस्त्यावरच कपडे धुणे, स्नान करणे, भांडी धुणे करीत असल्याने ते पाणी रस्त्यावरून वाहत जाते. त्याची घाण रस्त्यावरच पसरत असल्याने त्याची दुर्गंधी या भागात कायम असते. त्यामुळे येथून ये- जा करणाऱ्यांना तोंडावर रुमाल ठेवल्याशिवाय जाणे शक्य होत नाही. रस्त्यात साचलेल्या सांडपाण्याची दलदलही येथे अनेक भागात दिसते.
येथील काही घरांच्या छतावर पावसाचे पाणी साचते. या साचलेल्या पाण्यात प्लॅस्टिकसह इतर कचरा पडतो. सडणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते. तसेच सातत्याने पाणी साचत असल्याने त्यात डासांचा प्रादुर्भाव होत असल्याने डासांमुळे होणाऱ्या आजारांची भीतीही व्यक्त केली जात आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत या परिसरात दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याचा निचरा होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे कुणी लक्ष देत नसल्याने ही समस्या अजूनही सुटली नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.