Employees Strike : संप मिटताच आरोग्य कर्मचारी हजर

Hospital Staff file photo
Hospital Staff file photoesakal
Updated on

नाशिक : जुनी पेन्शनसाठी पुकारलेला बेमुदत संप सोमवारी (ता. २०) दुपारी मागे घेण्यात आला. त्यामुळे आरोग्य विभागातील संपात सहभागी कर्मचारी सोमवारी (ता. २०) सायंकाळपासूनच कामावर रुजू झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका झाला असून, रुग्णसेवाही सुरळीत सुरू झाली. ( Health workers present as soon as Employees Strike ends nashik news)

आरोग्य विभागातील वर्ग ३ व ४ चे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. यामुळे जिल्हा रुग्णालयांसह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आरोग्यव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपात एक हजार ७३ कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. मात्र सोमवारपर्यंत ४९२ कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले होते. संपात पर्यायी व्यवस्था म्हणून ९०३ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.

तसेच खासगी व शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील १२३ प्रशिक्षणार्थी परिचारिकांनाही बोलविले होते. त्याचप्रमाणे रोजंदारीप्रमाणे कंत्राटी भरतीप्रक्रिया सोमवारी (ता. २०) राबविण्यात आली. त्यास ६७ अर्ज प्राप्त झाले होते.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Hospital Staff file photo
Employees Strike : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण; RBHच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

दरम्यान, संप मिटल्याने संपात सहभागी कर्मचारी मंगळवारपासून कामावर हजर होणार आहेत. मात्र आरोग्य विभागातील रात्रपाळीतील कर्मचारी सोमवारीच हजर झाले होते.

संपकाळात २५ रुग्णांची तपासणी

संपकाळात जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला होता. या कालावधीत जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागात २५ हजार १८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

दोन हजार ७६३ आंतर रुग्णांची तपासणी झाली. ५२२ गर्भवतींची प्रसूती करण्यात आली, तर २८८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याचप्रमाणे नियोजित ३६ शस्त्रक्रिया झाल्या असून, १२२ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. तर आपत्कालीन परिस्थितीत २५२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

Hospital Staff file photo
H3N2 Virus : जिल्ह्याच्या वेशीवर ‘एच-३, एन-२’ रुग्ण! आरोग्य विभाग अलर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.