Nashik News : अवैधरीत्या सोनोग्राफी प्रकरणी उद्या सुनावणी

Medical team of the Municipal Corporation while taking action at Shri Balaji Super Specialty Hospital.
Medical team of the Municipal Corporation while taking action at Shri Balaji Super Specialty Hospital.esakal
Updated on

नाशिक : नाशिक रोड विभागातील देवळाली गाव येथील श्री बालाजी हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या सोनोग्राफी यंत्र बाळगल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यासह ११ जणांविरोधात गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व लिंगनिदान कायद्यांतर्गत दाखल खटल्यावर नाशिक रोड न्यायालयात गुरुवारी (ता. १९) सुनावणी होणार आहे. (Hearing tomorrow in case of illegal sonography Nashik News)

महापालिका क्षेत्रात अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रावर कारवाईची जबाबदारी पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असताना पालिकेच्याच सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राजेंद्र भंडारी यांच्या मालकीच्या खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे सोनोग्राफी मशिन आढळून आले आहे.

१६ डिसेंबरला नाशिक रोड येथील देवळाली गाव परिसरात श्री बालाजी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पालिकेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात अनधिकृत सोनोग्राफी मशिन आढळले. विशेष म्हणजे, या रुग्णालयाचा परवानादेखील नव्हता.

रुग्णालयाची इमारत ही डॉ. भंडारी यांच्या मालकीची असून, अनधिकृतपणे त्यांच्या नावाने हे रुग्णालय सुरू होते. त्यामुळे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी मशिनसह रुग्णालय सील केले. अनधिकृत रुग्णालय चालविल्याप्रकरणी वैद्यकीय विभागाने डॉ. भंडारी दांपत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

Medical team of the Municipal Corporation while taking action at Shri Balaji Super Specialty Hospital.
Nashik News : शासकीय कार्यालयांचा मालमत्ता कर थकीत!

दुसरीकडे महापालिकेत डॉक्टर असतानाही, खासगी वैद्यकीय व्यवसाय करण्यासह अनधिकृतपणे सोनोग्राफी मशिन ठेवल्याप्रकरणी डॉ. भंडारी यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला.

नाशिक रोडच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारींच्या न्यायालयात डॉ. भंडारी दांपत्यासह शुभम हॉस्पिटलचे तत्कालीन संचालक असलेले सहा डॉक्टर आणि हॉस्पिटल एका वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेणारे एक डॉक्टर अशा नऊ डॉक्टरांविरोधात दाखल खटल्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

Medical team of the Municipal Corporation while taking action at Shri Balaji Super Specialty Hospital.
Shirdi Accident Case : उपचारासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांचा थेट मंत्रालयात पाठपुरावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.