गोदाकाठावरील पिकांची मोठी हानी; त्वरित पंचनामे करत नुकसानभरपाईची मागणी

Panveli that came with water in the field of farmer named shantaram
Panveli that came with water in the field of farmer named shantaramesakal
Updated on

चांदोरी (जि. नाशिक) : मुसळधार पावसाने (Heavy Rain) तसेच धरण क्षेत्रातून होत असलेल्या विसर्गाने गोदावरी नदीला महापूर (Flood) आला, मात्र या पाण्याबरोबर वाहत आलेल्या पानवेलींमुळे शेतीची (farm Field) मोठे नुकसान झाले आहे.

या नुकसानीचा पंचनामा करून त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. (Heavy loss of crops by godavari Demand for compensation by making Punchnama immediately nashik Latest Marathi news)

महापुरामुले गोदाकाठच्या तसेच लगत असलेल्या शेकडो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पात्राबाहेर वाहणारी गोदावरी नदी तसेच सर्वच नाले ओहोळ ओसंडून वाहिल्याने काठच्या व समतल भागातील शेतातील जमीन खरडून सोयाबीनसह ऊसशेतीचे नुकसान झाले आहे.

महापुरात प्रशासनाने वाहत्या पाण्यात हात धुताना पानवेली काढण्याचे कौतुक केले, परंतु याच पानवेली वेळीच काढल्या असत्या तर आज होणारे नुकसान टळले असते अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

पानवेली वाहत जात शेतांमध्ये अडकून बसल्याने उभी पिके झाकली गेली असून गोदाकाठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Panveli that came with water in the field of farmer named shantaram
नाशिक : YCMOUच्‍या रस्त्याची दुर्दशा

"नदीकाठी असलेल्या शेतात पानवेली अडकलेली असून त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे." - शांताराम हिरे, शेतकरी चाटोरी.

"गोदावरी नदीला महापूर आल्याने पानवेलींमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करत नुकसानभरपाई द्यावी. पावसाने विश्रांती घेतली असली तरी शेतशिवारात पाणी साचून आहे. त्यामुळे गोदाकाठच्या भागातील पीक परिस्थितीचे पंचनामे करत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी."
- अशपाक शेख, ग्रामपालिका सदस्य, सायखेडा.

"महापुराचा पीक विम्यात समावेश करावा. महापुरामुळे वेळोवेळी नुकसान होणे आता शेतकऱ्यांना अजिबात परवडणारे नाही. महापुरग्रस्त शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महापूर पट्ट्यातील सर्व पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करावा."
- सिद्धार्थ वनारसे, माजी जिल्हा परिषद सदस्य, चांदोरी.

Panveli that came with water in the field of farmer named shantaram
11th Admission : अर्जाचा भाग 2 भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.