Nashik Unseasonal Rain: नांदूर शिंगोटे येथे 45 मिनिटे पावसाची जोरदार हजेरी

Heavy rain for 45 minutes at Nandur Shingote
Heavy rain for 45 minutes at Nandur Shingoteesakal
Updated on

Nashik News : नांदूर शिंगोटे व परिसरात शुक्रवारी दुपारी तीन वाजता अचानकपणे पावसाच्या सरी कोसळल्या.

येथील आज शुक्रवार बाजार असल्यामुळे सर्व व्यावसायिकांच्या धावपळ उडाली. सणासुदीचा बाजार असल्यामुळे बाजारला मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे काही काळ बाजार शांत झाला. (Heavy rain for 45 minutes at Nandur Shingote nashik news)

पावसाने घडली दिल्यानंतर दीपावलीचा बाजार असल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांची गर्दी सायंकाळी वाढली व त्यानंतर बाजार सायंकाळपर्यंत ग्राहक वर्ग खरेदीसाठी बाहेर पडला. मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढल्यामुळे नांदूर शिंगोटे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

त्यामुळे गावातून जाणारा नाशिक पुणे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Heavy rain for 45 minutes at Nandur Shingote
Nashik Unseasonal Rain: अवकाळी पावसाने बळीराजा धास्तावला! भात पीक वाचविवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

पोलिसांनी सदरची वाहतूक सुरळीत करून रस्ता मोकळा केल्यामुळे बाजारला पुन्हा गर्दी वाढली त्यातच शेतकरी वर्गाची यामुळे मोठी धांदल उडाली व बाजारामध्ये दुकानदारांची यामुळे मोठ्या प्रमाणावर धांदल निर्माण झाली.

कारण अचानकपणे पाऊस कोसळल्याने बाजार पूर्णपणे शांत झाला होता त्यातच आज येथील कांदा मार्केट असल्यामुळे त्या वाहनांच्या मुळे गर्दी वाढल्यामुळे सर्वत्र गर्दीचे स्वरूप पाहावयास मिळाली.

Heavy rain for 45 minutes at Nandur Shingote
Mumbai Unseasonal Rain : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची दमदार हजेरी; दिवाळी साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.