मनमाड : अखेर वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो

जिल्ह्यातील धरणे भरत असतांना मनमाडचे धरण कधी भरते, या प्रतीक्षेत मनमाडकर असतानाच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने मनमाडकरांची प्रतीक्षा संपवली आणि वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागले
मनमाड : अखेर वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो
मनमाड : अखेर वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो sakal news
Updated on

मनमाड : सतत पाणी टंचाईने बेजार मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण यंदाही भरते की नाही, अशी शंका होती. जिल्ह्यातील धरणे भरत असतांना मनमाडचे धरण कधी भरते, या प्रतीक्षेत मनमाडकर असतानाच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने मनमाडकरांची प्रतीक्षा संपवली आणि वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागले. यामुळे पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या मनमाड शहराला काहीसा दिलासा मिळाला आहे.

मनमाड : अखेर वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो
यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात ST गेली वाहून, तीन जणांचा मृत्यू

मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण भरले, यावर विश्वास बसत नसल्याने नागरिक धरणावर स्वतः जाऊन पाहत आहेत. पाणी टंचाईसाठी प्रसिद्ध असलेल्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या मनमाड शहराला दिलासा मिळाला असून किमान सहा महिने पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यंदाही वाघदर्डी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. २०१६ मध्ये धरण ओव्हरफ्लो झाले होते. २०१६ मध्ये तब्बल दहा वर्षांनी धरण भरले होते त्यानंतर २०१९ मध्ये भरले. वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अल्प पाऊस पडत असल्याने धरण लवकर भरत नाही.

मनमाड : अखेर वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो
भावना गवळींच्या अडचणीत वाढ? सईद खानला अटक

यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या पंधरा दिवसांपासून समाधानकारक पाऊस बरसत असल्याने वाघदर्डी धरण शंभर टक्के भरले आणि धरणाच्या सांडव्यावरून पाणी खळखळून वाहू लागले. ऐन पावसाळ्यात मनमाड शहराला १५ दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. आता वाघदर्डी धरण भरल्याने किमान सहा महिने हे पाणी शहराला पुरेल व पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तनही मिळणार असल्याने पुढील काळात मनमाड शहराला पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नाही त्यामुळे नागरिकांत समाधान आहे. पालिकेने किमान दहा दिवसाआड पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सध्या शहराची लोकसंख्या सव्वा लाख आहे धरणाची क्षमता आणि कमी पर्जन्यमान यामुळे पाणी टंचाई निर्माण होत असल्याने शहराला शाश्वत पाणी मिळावे, यासाठी करंजवण जलवाहिनी योजनेच्या कामाला गती मिळणे गरजेचे आहे

सुरवातीला चांगला पाऊस झाला नसला तरी पालखेडचे आवर्तन घेतले होते त्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीचा चांगला पाऊस झाल्याने धरणात पाण्याची धार सुरू झाली त्यामुळे धरण भरले आहे आता सहा महिने तरी पाणीटंचाई जाणवणार नाही दिवस कमी करून पाणी पुरवठ्याचे नियोजन करणार आहे

- पद्मावती धात्रक, नगराध्यक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()