Unseasonal Rain : उत्राणेत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; पोल्ट्री शेड जमीनदोस्त अन् घरांचेही नुकसान

Damaged House
Damaged Houseesakal
Updated on

Unseasonal Rain : बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे सायंकाळपासून झालेल्या वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटात जोरदार पावसामुळे शेतीशिवारातील शेतीपिकांसह जोडव्यवसाय असलेल्या पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाला तर बहुतांश घरांचे अतोनात नुकसान झाले.

दरम्यान शासन स्तरावर ताबडतोब नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे. (Heavy rain with gales Poultry shed destroyed and houses also damaged at utrane Unseasonal Rain nashik news)

गावशिवारात गुरूवार (ता.६) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. येथील शिवबा पगार यांचा पाच हजार पक्षांचा पोल्ट्री सेड जमीनदोस्त झाला, सुनील प्रभाकर पगार यांच्या राहत्या घरावरील पूर्ण पत्रे वादळात उडून पडले.

कापडणीस संदीप यांच्या कांदा चाळीचे नुकसान झाले. या अवकाळी पाऊसामुळे सर्वाधिक कांद्याचे मोठे नुकसान होणार असून कांदा उत्पादकांवर गहिरे संकट कोसळले आहे. तसेच बहुतांश भागात झाडे उन्मळून पडले होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Damaged House
Nashik News: निफाड तालुक्यातील 22 गावांतील वाडी वस्त्यांवरील वाट सुकर! गिते व कदमांच्या प्रयत्नांना यश

शासनाच्या माध्यमातून पंचनामे तातडीने करावेत यासाठी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा रयत क्रांतीचे दीपक पगार यांनी तसीलदार जितेंद्र इंगळे-पाटिल व कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्याशी संपर्क साधून माहीती दिली व पंचनामे करण्याची विनंती केली.

त्यानंतर तलाठी श्री. घोडे व कृषी विभागाचे श्री. धनगर यांनी उत्राने शिवारात पंचनामे करण्याची सुरवात केली आहे. दरम्यान आखतवाडेसह भडाणे परिसरातही जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊसाने धडक दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

आमदार दिलीप बोरसे, सरपंच अशोक खैरनार यांनी पाहणी केली. अंबासन येथील ढोबले शिवारात शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडावर वीज चाटून गेली सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र वीजेच्या मोठ्या आवाजामुळे आजूबाजूस असलेल्या शेतकऱ्यांत भीतिदायक परिस्थिती निर्माण झाली होती.

Damaged House
Nashik News: सुरगाणा तालुक्यात ठाणगाव बाऱ्हे येथे 50 ते 60 जणांना महाप्रसादातून विषबाधा; आकडा वाढण्याची भीती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.