नाशिक : तीन दिवस सतत पडत असलेल्या पावसाने (Rain) मध्यरात्री दीड वाजता जोर पकडल्याने शहरात पुर येउन मेन रोड व तेली गल्ली भागातील रहिवाश्यांच्या घरात व दुकानात पाणी शिरल्याने ऐन मध्यरात्री रहिवाश्यांच्या धावपळ करावी लागली. (Heavy rains in TrambakeshwarMonsoon Update News Nashik)
कालरात्री पासुन आज सकाळ पर्यंत १८२ मि. मि. पावसाची नोंद झाली असली तरी या मध्ये तफावत असु शकते. पुर्वी गंगाद्वार मध्य व तळाशी निवृत्तीनाथ पटांगणात पाऊस मोजनी यंत्र होते. सध्या त्रंबकेश्वर विश्राम गृह व वाळुंज, हरसुल असा वेगवेगळ्या स्वरुपात पाऊस मोजुन ही निश्चित आकडेवारी ठरत नाही व मिळतही नाही. त्रंबकेश्वर तालुका आदिवासी व वाड्या पाड्यांचा असुन पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात अडचणी येतात.
या भागात दळणवळण व वाहतुक सोयींची अनास्था आहे. अशातच काही प्रसंग निर्माण झाल्यास कोणत्याही स्वरूपात व्यवस्था निर्माण होउ शकत नाही. या बाबतीत सर्वच उदासीन असुन घटना घडल्यावर धावपळ करण्यासाठी प्रयत्न करनारे आहेत. सलग च्या पावसाने त्रंबकेश्वर तालुक्यातील बहुतांशी खेड्यात घरांचे नुकसान झाले आहेत व भात खाचरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिसरातील पुलांवरून पाणी वहात असुन दळणवळणास अडचणी येत आहेत.
गोदावरी ची उपनदी किकवी वहात असुन तीच्या काठावरील गावात पाणी आहे. तळवाडे, पिंपळद या गावालगत नदी व ओढे दुथडी भरुन वहात आहेत. त्रंबकेश्वर तेली गल्ली व मेन रोड परिसरातील लोकांच्या दुकानात व घरात मध्यरात्री पाणी शिरल्याने घरगुती सामान व व्यावसायिकांना सामान पाण्यात भाजल्याने नुकसानी झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.