दरवर्षी जूनच्या ७ तारखेपासून पावसाला सुरवात होते. यंदा मात्र मंगळवारी (ता.१) पावसाने दुपारपासून दमदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.
इगतपुरी शहर (जिनाशिक): पावसाचे माहेरघर समजले जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यासह शहरात दरवर्षी जूनच्या ७ तारखेपासून पावसाला सुरवात होते. यंदा मात्र मंगळवारी (ता.१) पावसाने दुपारपासून दमदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. यामुळे छोटे व्यवसायिकांचे नुकसान झाले.
शहरातील खड्डेमय झालेला जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर पाणी वाहू लागल्याने पादचारी व वाहनधारकांची पहिल्याच पावसात चांगलीच कसरत पाहायला मिळाली. पावसामुळे झाकोळलेल्या वातावरणात वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरात सर्वत्र अंधार पसरला. भाजी व फळ विक्रेत्यांची तारांबळ उडाली. अनेक ग्रामिण भागतील भाजी विक्रेत्यांना घरी पोचावे कसे, याची चिंता लागली होती. शहरातील झोपडपट्या व वसाहतीत पाणी घुसल्याने अनेकांचे घराचे छप्पर उडाले, तर अनेक घरांत पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. महामार्गावर वाहन संथगतीने सुरू असून, महामार्गावर धुके पसरले असल्याने वाहन चालकांची कसरत होताना दिसत आहे. नगरपरिषदेने नालेसफाई न केल्याने नाल्यांचे व गटारींची घाण रस्त्यावर वाहत होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
(Heavy rains lashed at Igatpuri taluka nashik news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.