Nashik News : Helmetसक्तीची कारवाई पुन्हा जोमात; 300 दुचाकीस्वारांना ठोठावला दंड

Traffic Rule News
Traffic Rule Newsesakal
Updated on

नाशिक : दोन दिवसांच्या खंडानंतर शहर वाहतूक पोलिस शाखेने शहरभर पुन्हा हेल्मेटसक्तीची मोहीम सुरू केली आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या व वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांना कारवाई थंडावल्याने काहीसा दिलासा मिळाला होता.

परंतु, सोमवार (ता. १९) पासून पुन्हा जोमात कारवाई सुरू झाल्याने विनाहेल्मेट वाहनचालकांना दणका बसला. (Helmet Strictness action Re energized 300 bikers fined Nashik News)

Traffic Rule News
Nashik News : वाहकांच्या आडमुठेपणाने दिव्यांगांना मनस्ताप

पोलिस आयुक्त नाईकनवरे यांची गेल्या आठवड्यात बदली झाली. तसेच गेल्या शुक्रवारी (ता. १६) नवीन आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभारही स्वीकारला. मात्र, यामुळे शहर वाहतूक पोलिस शाखेला हेल्मेटसक्तीच्या कारवाईचाच विसर पडला होता.

यासंदर्भात वृत्त ‘सकाळ’मधून प्रसिद्ध होताच, वाहतूक शाखेने खडबडून जागे होत सोमवारपासून पुन्हा शहरभर हेल्मेटसक्तीची कारवाई सुरू केली. दिवसभरात शहरातील सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, गंगापूर रोड या परिसरातील काही रस्त्यांवर वाहतूक शाखेने सदरची कारवाई केली.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Traffic Rule News
NMC Tax Recovery : पन्नास हजारांच्या पुढील थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजणार!

यात २९७ विनाहेल्मेट दुचाकी चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करीत १ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा दंडही वसुल केला. पोलिसांनी तीन-चार दिवसांच्या खंडानंतर अचानक आजपासून कारवाई सुरू केल्याने विनाहेल्मेट चालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला.

वाहतूक पोलिसांची कारवाई

* विनाहेल्मेट दुचाकीस्वार : २९७

* वसुल दंड : १ लाख ४८ हजार ५०० रुपये

Traffic Rule News
Nashik News : हायड्रोलिक शिडीसह यांत्रिकी झाडू खरेदीची चौकशी; शासनाने मागविला अहवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()