Nashik MD Drug Case : ‘एमडी’ ड्रग्ज तपासी पथकात ‘फड’; नाशिक शहर पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चा

drugs
drugssakal media
Updated on

Nashik MD Drug Case : ‘एमडी’ ड्रग्ज प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास अमलीपदार्थ विरोधी पथक करीत आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक रोड पोलिस ठाण्यात कार्यरत असताना दोन वेळा नियंत्रण कक्षात ‘जमा’ करण्यात आलेले सहाय्यक निरीक्षक हेमंत फड यांचा पुन्हा शहराच्या अमली पदार्थविरोधी पथकात शिरकाव झाल्याने पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. (hemant fad in MD' drug investigation team nashik crime news)

एवढेच नव्हे, तर अतिशय संवेदनशील असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातही ‘राजकीय’ हस्तक्षेप होऊ लागल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली. नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीतील शिंदे गावात ‘एमडी’ ड्रग्जचा कारखाना उद्‌ध्वस्त केल्यापासून संपूर्ण शहरच अमली पदार्थाच्या विळख्यात सापडले की काय, अशीच चर्चा राज्यभर होत आहे. शिंदे गावातील गुन्ह्यासह वडाळ्यातील ‘एमडी’ ड्रग्ज प्रकरणाचा तपास शहराच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास मुंबई आणि पुणे पोलिसही करीत असल्याने हे प्रकरण शहरासाठी अत्यंत संवेदनशील झाले आहे.

drugs
Nashik Drug Case: MD ड्रग्जसप्रकरणी आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू; ‘राजकीय’ नावांमुळे प्रकरणात चर्चांना उधाण

काही महिन्यांपूर्वी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हेशोध पथकाचे कामकाज अत्यंत निराशाजनक असल्याने आयुक्त अंकुश शिंदे यांनी संपूर्ण पथकच नियंत्रण कक्षात जमा केले होते. त्यात सहाय्यक निरीक्षक फड यांचाही समावेश होता. परंतु, काही दिवसांतच हेच फड पुन्हा नाशिक रोड पोलिस ठाण्यात हजर झाले होते.

नाशिक रोडच्या शिंदे गावातील कारवाईतही ते होते. तपासी पथकातही होते. मात्र, तपास अमली पदार्थविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला.

आता पुन्हा नाशिक रोड पोलिस ठाण्यातून फड यांची अमली पदार्थविरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पोलिस आयुक्तालयात उलटसुलट चर्चांना उधाण आले. त्यांची ही बदली कोणाच्या मर्जीतून झाली, असाही सूर दबक्या आवाजात आहे.

drugs
Nashik Crime News : नाशिकच्या गुन्हेगारीतील क्रूरतेचे मूळ ‘एमडी’; नशेच्या तपासणीला बगल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()