Nashik News : जिल्हा बँकेच्या मदतीसाठी गोडसे यांचे केंद्रीय सहकार मंत्र्यांना साकडे

MP Hemant Godse
MP Hemant Godseesakal
Updated on

Nashik News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या आक्षेपामुळे अडचणीत आली ते आक्षेप शिथिल करावेत, अशी मागणी करीत खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय सहकार मंत्री ज्ञानेश कुमार यांना साकडे घातले.

जिल्हा बँक अडचणीत आल्याने बँकेकडून शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा बंद आहे. शेतकरी आणि ठेवीदारांना देण्यासाठी बँकेला गतवैभव केंद्रीय सहकार विभागाने हस्तक्षेप करण्यासाठी खासदार गोडसे प्रयत्नशील आहे. (hemant Godse entrusts Central Cooperation Minister to help District Bank Nashik News)

केंद्रीय सहकार मंत्री ज्ञानेश कुमार यांची शुक्रवारी (ता. १९) खासदार गोडसे यांनी दिल्लीत भेट घेउन बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीची व्यथा मांडली.

प्रशासकीय हलगर्जीमुळे बँक अडचणीत आली आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा सहकारी बँकेवर प्रशासक नेमलेले आहेत. प्रशासनाच्या चुकांमुळे बँक आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर पडली आहे. याचा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना फटका बसला.

शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी केंद्रीय सहकार विभागाने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हा बँकेने ठेवी आरबीआय किंवा एमएससी बँकेकडे न ठेवता नॅशनल बँकेत ठेवी ठेवल्याने शासनाने बँकेला लावलेला १७ कोटी रुपयांचा लावलेला दंड माफ करावा, केंद्र शासनाने नोटबंदी लागू केल्याने बँकेकडे आजमितीस पडून असलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या २१ कोटी रुपयांच्या नोटा व्हॅलिड मनी म्हणून गृहित धराव्यात, जिल्ह्यातील अर्बन बँकांनी जिल्हा बँकेकडे ठेवी ठेवल्याने शासनाने त्यांच्यावर बंधन लादलेली आहेत.

लादलेल्या बंधनांमधून अर्बन बँकांना रिलॅक्सेशन द्यावे,नाशिक सहकारी साखर कारखान्यातील तत्कालीन कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे दीड कोटी रुपये जिल्हा बँक प्रशासन देण्यास तयार असून पीएफ प्रशासनाने लावलेले दंड आणि इतर चार्जेस रद्द करावेत आदी मागण्यांचे निवेदन खासदार गोडसे यांनी दिले.

MP Hemant Godse
Dada Bhuse : रोजगार हमीच्या प्रत्यक्ष कामांची संख्या वाढवा : दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.