Hemant Parakh Kidnapping Case: वॉचमनच्या पोरानेच 2 कोटींसाठी रचला अपहरणाचा कट! राजस्थानातून तिघांना अटक

Arrested
Arrestedesakal
Updated on

Hemant Parakh Kidnapping Case : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण प्रकरणाचा उकल झाली असून, या कटाचा सूत्रधार त्यांच्या गोदामाचा वॉचमनचा मुलगा आणि वाडिवर्हे येथील ढाबामालक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी नाशिक शहर गुन्हेशाखेने आठवडाभर राजस्थानातून ठाण मांडून तिघा संशयितांना अटक केली. तसेच, खंडणीसाठी दिलेल्या २ कोटींपैकी १ कोटी ३३ लाखांची रोकड व अपहरणासाठी वापरण्यात आलेले बोलेरो कॅम्पर वाहन व गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

अपहरणाची यशस्वी उकल केल्याप्रकरणी आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहर गुन्हेशाखेच्या युनिट एक व दोनच्या पथकाला ७०-७० हजार रुपयांचे रिवॉर्ड जाहीर केले.

बहुचर्चित आणि संवेदनशिलरित्या या अपहरण नाट्याचा यशस्वी उकल केल्याने शहर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. (Hemant Parakh Kidnapping Case Watchmans son made kidnapping plot for 2 crores Three arrested from Rajasthan nashik crime)

खंडणीसाठी दिलेल्या २ कोटींपैकी १ कोटी ३३ लाखांची रोकड व अपहरणासाठी वापरण्यात आलेले बोलेरो कॅम्पर वाहन व गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
खंडणीसाठी दिलेल्या २ कोटींपैकी १ कोटी ३३ लाखांची रोकड व अपहरणासाठी वापरण्यात आलेले बोलेरो कॅम्पर वाहन व गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. esakal

मुख्य सूत्रधार अनिल भोरू खराटे (२५, रा. लहांनगेवाडी, वाडिवर्हे, ता. इगतपुरी), महेंद्र उर्फ नारायणराम बाबुराम बिष्णोई (३०, रा. मोर्या, ता. लोहावत, जि. जोधपूर राजस्थान) यांच्यासह पिंटू उर्फ देविसींग राजपूत (२९, रा. राजेंद्रनगर, जि. पाली. राजस्थान), रामचंद्र ओमप्रकाश बिष्णोई (२०, रा. गाव फुलसरा छोटा, ता. बजू, जि. बिकानेर, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर अजूनही तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पारख अपहरण प्रकरणाबाबत माहिती दिली. यावेळी गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ दोनचे उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुकत डॉ. सीताराम कोल्हे, युनिट एकचे वरिष्ठ अधिकारी व या गुन्ह्याचा यशस्वी तपास करणारे विजय ढमाळ, युनिट दोनचे रणजित नलावडे यांच्यासह तपासी पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.

पारख अपहरणप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही संशयितांना न्यायालयाने येत्या शुक्रवारपर्यंत (ता. १५) पोलीस कोठडी सुुनावली आहे.

संशयितांकडून १ कोटी ३३ लाखांची रोकड, बोलेरो कॅम्पर, गावठी कट्टा, पाच जिवंत काडतुसे असा ८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुददेमाल असा १ कोटी ४१ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, सहायक आयुकत डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युुनिट एकचे वरिष्ठप पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, युनिट दोनचे रणजित नलावडे, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णू उगले, सहायक उपनिरीक्षक रवीद्र बागुल, नाजिम पठाण, विशाल काठेे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, उपनिरीक्षक सुगन साबरे, येमाजी महाले, शरद सोनवणे, प्रदीप म्हसदे, मुख्तार शेख, आप्पा पानवळ, राहुल पालखेेडे, महेंश साळुंके, राजेश राठोड, जगेशवर बोरसे, किरण शिरसाठ यांनी बजावली.

Arrested
Jalgaon Crime News : शहराच्या मध्यवर्ती भागात कुंटणखाना; बसस्टॅण्डशेजारील लॉजवर छापा

अपहरण नाट्य :

१. असा रचला कट

पारख यांची मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडिवर्हे परिसरात जमीन असून, त्याठिकाणी गोडाऊन आहे. याठिकाणी भोरू खराटे हे वॉचमन आहे. या जमिनीसमोर बिकानेर ढाबा असून, तो संशयित महेंद्र बिष्णोई चालवतो.

या ढाब्यावर वॉचमन खराटे यांचा मुलगा अनिल खराटे याचे येेणेजाणे होते. त्यावेळी अनिल व महेंद्र यांच्यात ओळख परिचय झाला. त्यातून महेंद्र याने जमिनीबाबत विचारणा केल्यानंतर अनिलने माहिती दिली.

त्यानंतर त्यांनी हेमंत पारख यांच्या अपहरणाचा कट रचला. राजस्थानात खंडणीसाठी अपहरणाचे प्रकार सर्रास होत असल्याचे त्याने सांगत राजस्थानातील सराईत गुन्हेगार पिंटू उर्फ देविसिंग बिष्णोई, रामचंद्र बिष्णोई यांच्यासह आणखी तिघांना कटाची माहिती दिली.

२. दोन महिन्यांपासून रेकी

हेमंत पारख यांच्या अपहरणाचा कट रचल्यानंतर संशयितांनी पारख यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली. दिवसभरात त्यांच्या मागावरच संशयित दुचाक्यांवरून फिरायचे. पारख कुठे जातात, कधी घराबाहेर पडतात.

घरी कधी येतात, यासह त्यांच्या जाण्या-येण्याचे मार्ग कोणकोणते याचीही रेकी संशयितांनी केली होती. दोन महिने ते पारख यांच्यावर पाळत ठेवून होते. गेल्या २ सप्टेंबर रोजीही संशयित पारख यांच्या मागावरच होते.

पारख जेव्हा रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास घरी आले. त्यांची कार गेटवरच थांबली असता त्यांना मित्राचा फोन आला.

त्यामुळे ते तिथेच खाली उतरले आणि हीच संधी साधून संशयितांनी कट्ट्याचा धाक दाखवून पारख यांना बोलोरो कॅम्पर (आरजे ४३ जीए ६५५३) वाहनामध्ये बळजबरीने ओढून डांबले आणि महामार्गाने विल्होळी येथील जैन मंदिराजवळ आले.

३. रात्री ११ ला खंडणीसाठी पहिला कॉल

विल्होळी येथे दुचाकीवरून आणखी दोघे आले असता, त्यातील एकजण बोलोरोत बसला आणि बोलोरोतील महेंद्र बिष्णोई दुचाकीवरून पहिने मार्गे अंजनेरीकडे तर चौघेजण पारख यांना घेऊन बोलोरोतून हतगड मार्गे गुजरातच्या दिशेने मार्गस्थ झाले.

महेंद्र बिष्णोई व अनिल खराटे हे अंजनेरी परिसरात पोहोचले. त्यांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास खंडणीसाठी हेमंत पारख यांचे बंधूंना पहिला कॉल करीत २ कोटींची मागणी केली.

४. खंडणी मिळताच पारख यांची सुटका

खंडणीची दोन कोटींची रक्कम देण्यास पारख यांच्या बंधूंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर शनिवारी (ता.२) मध्यरात्रीनंतर रविवारी (ता.३) पहाटे चार वाजेपर्यंत संशयितांकडून पारख यांच्या बंधूंना खंडणीची रक्कम देण्यासाठी कसारा ते पडघा या दरम्यान वारंवार ठिकाणं बदलली गेली.

शेवटी चारच्या सुमारास एका ठिकाणी खंडणीची बॅग सोडून जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे, खंडणीची बॅग रविवारी (ता.३) पहाटे चारच्या सुमारास ‘ड्रॉप’ झाल्यानंतर, गुजरात हायवेवरील बलसाड जवळ हेमंत पारख यांना सोडून देण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Arrested
Kolhapur Crime : धक्कादायक! कपडे घेण्यासाठी पैसे मागितले म्हणून पत्नीला पाजलं फिनेल; पतीसह सासू-सासऱ्यांना अटक

अपहरणाची उकल

१. पारख यांची सुटका

हेमंत पारख यांची सुखरुप सुटका झाल्याने पारख कुटूंबियांसह पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी पोलिसांसमोर संशयित अपहरणकर्त्यांंना जेरबंद करण्याचे आव्हान उभे राहिले होते.

शहर गुन्हेशाखेची पथके तात्काळ गुजरात, मुंबई आणि जव्हार-मोखाड्याच्या दिशेने रवाना झाली होती. पारख यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असल्याने त्यांना रस्ता समजला नाही.

परंतु पोलिसांनी केलेल्या चौकशीतून अनेक धागेदोरे मिळून आले. त्यानुसार दोन पथके गुजरातमार्गे राजस्थानपर्यंत पोहोचले.

२. जोधपूरपासून सुरुवात

पारख यांच्या बंगल्याच्या सीसीटीव्हीत कैद झालेली बोलोरो कॅम्पर वाहन दिसले. तसेच दिवसभरातील सीसीटीव्ही फुटेजवरून काही संशयितांचे चेहरे पोलिसांना समजले. तेच बोलोरो कॅम्पर हे लोहवतच्या मार्केटमध्ये दिसले असता, त्यावर पोलिसांनी नजर ठेवली.

त्यावेळी मुख्य संशयित महेंद्र बिष्णोई, पिंटू राजपूर व रामचंद्र बिष्णोई या तिघांना पोलिसांनी गेल्या बुधवारी (ता.६) ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. या कटाची उकल होण्यास येथूनच सुरूवात झाली.

३. वॉचमनचा मुलगा निघाला सूत्रधार

महेंद्र बिष्णोईच्या अटकेनंतर पारख अपहरण नाट्याचा मुख्य सूत्रधार पारख यांच्या गोदामाचा वॉचमनचा मुलगा अनिल खराटे असल्याचे समोर आले. त्यास वाडिवर्हेतून ताब्यात घेण्यात आले. संशयितांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

परंतु त्यांच्याकडे वसुल केलेल्या खंडणीची रक्कम मिळत नसल्याने पोलिसांनी पुन्हा लोहवत, पोखरण या वाळवंटी परिसरात धाव घेतली.

त्याठिकाणी संशयितांनी दडवून ठेवलेली १ कोटी ३३ लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली. अजूनही या अपहरणातील तीन संशयित पसार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

कॉलिंगसाठी ‘व्हिआयपी’ कॉलचा वापर

खंडणीची मागणी करण्यासाठी संशयित महेंद्र बिष्णोई याने ‘व्हिआयपी’ कॉलचा वापर केला. सदरचा कॉल सहजासहजी ट्रेस करता येत नाही. राजस्थानातील सीमावर्ती भागात तस्करीसाठी या व्हिआयपी कॉलचा वापर केला जातो.

त्याचे एक ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागते. ते केल्यानंतर दुसर्या मोबाईलचे इंटरनेट हॉटस्पॉट घ्यायचे. त्यानंतर समोरील व्यक्तीला कॉल केला जातो.

समोरील व्यक्तीला १४ आकडी क्रमांकावरून कॉल येतो. हे कॉल ट्रेस करता येत नाही. यासाठी शहर गुन्हेशाखेने एका सायबर तज्ज्ञांची मदत घेतली होती.

संशयित सराईत गुन्हेगार

महेंद्र बिष्णोई विरोधात राजस्थानात अंमल पदार्थांच्या तस्करीचे दाेन गुन्हे तर, पिंटू उर्फ देविसिंग राजपूत याच्याविरोधात चोरी, हाणामारीचे १७ गुन्हे आहेत. अनिल खराटे याच्याविरोधात नाशिक ग्रामीणमध्ये खंडणी, चोरी, हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत.

तपासी पथकाला रिवॉर्ड

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पारख अपहरण प्रकरणाचा यशस्वी उकल करणार्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट एक आणि युनिट दोन या दोन्ही पथकाला प्रत्येकी ७० हजार रुपयांचे रिवॉर्डही जाहीर केले आहे.

त्याचप्रमाणे, लवकरच या पथकांचा विशेेष कामगिरीनिमित्ताने प्रशस्तीपत्र देत सत्कार केला जाणार आहे. यावेळी आयुक्त शिंदे यांनी युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचे विशेष कौतूक करीत गुन्ह्याची उकल करण्यात त्यांचे योगदान अधोरेखित केले.

Arrested
Jalgaon Bribe Crime : पारोळा पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक लाचेच्या जाळ्यात; अटक न करण्यासाठी घेतले 8 हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()