Nandurmadhmeshwar Bird Sanctuary : स्वातंत्र्यदिनी नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जास्वंद बागेमध्ये शंभर रोपांची लागवड करण्यात आली.
नेचर क्लब ऑफ नाशिकच्या या उपक्रमासाठी तहसीलदार शरद घोरपडे (निफाड), प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक शेखर देवकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक मनोज सिन्हा उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते जास्वंदीच्या रोपांची लागवड करण्यात आली. (hibiscus Plantation at Nandur Madhmeshwar Bird Sanctuary on Independence Day nashik news)
पक्षी अभयारण्यात पक्ष्यांना आकर्षित करणारे वृक्ष लावून त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. औषधी वनस्पती लागवड होणे अपेक्षित असल्याचे सांगत श्री. घोरपडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. श्री. देवकर यांनी अभयारण्याची माहिती दिली. जास्वंद बागेविषयी संस्थाध्यक्ष प्रा.आनंद बोरा म्हणाले की, जास्वंदाचे फुले मलेशिया आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय फूल आहे.
जास्वंद फुलाला चहा बनवण्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्रात अनेक भागामध्ये जास्वंदचा चहा प्रसिद्ध आहे. पक्षी अभयारण्यात पक्षी आणि फुलपाखरांची संख्या वाढण्यात जास्वंद बागेची मदत होणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बागेत शंभर जातीचे तीनशे रोपे लावण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात शंभर रोपे लावण्यात आली.
उपक्रमासाठी सहकार्य करणारे पक्षीमित्र डॉ. जयंत फुलकर, गणपत हडपे, उमेश नागरे, रवींद्र वामनाचार्य, भीमराव राजोळे, विकास गारे, रोहित मोगल, गणेश वाघ, सुनील दराडे यांचा सत्कार करण्यात आला. चापडगावचे सरपंच अनिल सोनवणे, वनरक्षक संदीप काळे, आशा वानखेडे, अमोल दराडे, पंकज चव्हाण, रोशन पोटे, शंकर लोखंडे, अमोल डोंगरे, प्रमोद दराडे आदींसह पक्षीमित्र उपस्थित होते. गंगाधर आघाव यांनी आभार मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.