Nashik: वेदविद्येच्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी! भोसला महाविद्यालय, गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानमध्ये करार

On recognition of being present at the MoU between Maharshi Gautam Godavari Ved Vidya Pratishthan and Bhosla Military College.
On recognition of being present at the MoU between Maharshi Gautam Godavari Ved Vidya Pratishthan and Bhosla Military College.esakal
Updated on

: महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान आणि भोसला सैनिकी महाविद्यालय यांच्‍यात संशोधन आणि शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत माहितीची देवाणघेवाण केली जाणार आहे.

त्‍यानुसार परस्पर सहमतीने अल्प मुदतीचे निरंतर शैक्षणिक कार्य संयुक्‍तरित्‍या केले जाणार असून, त्याचा लाभ दोन्ही संस्थांमधील विद्यार्थ्यांना होईल.

वेदविद्येचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्‍ध होणार आहेत. (Higher education opportunities for Vedic students Agreement in Bhosla College Godavari Ved Vidya Institute Nashik)

यासंदर्भात नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यावर प्रधान आचार्य रवींद्र पैठणे गुरुजी आणि प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

नाशिकमध्ये वेदविद्येचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथमच उच्चशिक्षणाची अशी संधी यामुळे उपलब्ध झाली आहे.

कार्यक्रमाला इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रभावती जगताप, समन्वयक प्रा. भारत गुगाणे, प्रा. विक्रम शर्मा, सागर आहेर उपस्थित होते. यापुढे संयुक्त विद्यमाने चर्चासत्रे, परिषदा व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल.

पदवीपूर्व, पदवीधर व डॉक्टरेट स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी संशोधनात्मक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतील. प्रशिक्षक, तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्यवस्था केली जाईल.

On recognition of being present at the MoU between Maharshi Gautam Godavari Ved Vidya Pratishthan and Bhosla Military College.
NMC News: फास्ट ट्रॅकवर हायड्रोलिक शिडी खरेदी! पूर्वीची वादग्रस्त प्रक्रिया रद्द; 15 दिवसात निविदा प्रक्रिया

यामुळे महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानमधील विद्यार्थी भोसला सैनिकी महाविद्यालयात उच्चशिक्षण घेऊ शकतील, इंटर्नशिप करू शकतील. करारानुसार दोन्ही संस्थांमधील प्राध्यापक सहकार्य करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

त्यांना उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन देतील. वैचारिक देवाणघेवाण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवतील. त्यांच्या कामगिरीचे विविध टप्प्यांवर मूल्यमापन करण्यात येईल. गुणप्रदान करून विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचे तांत्रिक अहवाल तयार केले जातील.

दोन्ही संस्थांच्या समन्वयासाठी अध्यापन व संशोधन विद्या शाखेतील सदस्याची नियुक्ती करण्यात येईल. पुढे स्वतंत्र समन्वय समिती गठित केली जाणार असल्‍याचे करारात नमूद केले आहे.

On recognition of being present at the MoU between Maharshi Gautam Godavari Ved Vidya Pratishthan and Bhosla Military College.
Nashik: कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषणमुक्तीला प्राधान्य! वस्रांतरगृह पाडण्याची आर्किटेक्ट-इंजिनिअर्स असोसिएशनची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()