Makar Sankrant News : राम - रहीमच्या पतंगाने घेतली उंच भरारी

Ganjmal: Ram-Rahim couple enjoying flying kites on the terrace of a building in Panchsheelnagar
Ganjmal: Ram-Rahim couple enjoying flying kites on the terrace of a building in Panchsheelnagaresakal
Updated on

जुने नाशिक : जातीपातीचे राजकारण केवळ राजकारणात आणि संकुचित समज असलेल्यांमध्ये चालते. सामान्य मात्र आजही गुण्यागोविंदाने राहत सामाजिक आणि धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवून आणतात. त्याचप्रमाणे सणांनादेखील कुठलीही सीमारेषा किंवा समाज वा धर्माचे बंधन नसते.

याचा अनुभव प्रत्येक सणांमध्ये येत असतो. संक्रांत सणदेखील त्यातून सुटलेला नाही. याचे उत्तम उदाहरण गंजमाळ येथील एका इमारतीच्या टेरेसवर बघावयास मिळाले. राम आणि रहीम यांच्या पतंगीने उंच भरारी घेत सामाजिक एकतेचे दर्शन घडवून दिले. (Hindu Muslim Brothers Both Celebrating Makar Sankranti and flying kite give social message of unity Nashik News)

Ganjmal: Ram-Rahim couple enjoying flying kites on the terrace of a building in Panchsheelnagar
Nashik News : लेखा विभागाचे हात दाखवून अवलक्षण

रविवारी (ता. १५) सर्वत्र मकरसंक्रांत उत्साहात साजरी करण्यात आली. पतंगप्रेमींचा उत्साह तर काही औरच होता. इमारतीचे टेरेस, रस्ते तसेच मोकळे मैदान अशा सर्व ठिकाणी पतंग उडविताना दिसत होते. तर दुसरीकडे जुने नाशिक, वडाळा गाव मुस्लिमबहुल भागातदेखील पतंगोत्सव मोठ्या प्रमाणावर रंगलेला दिसून आला.

अशा या सर्व दृश्यांमध्ये गंजमाळ येथील एक दृश्य सामाजिक धार्मिक ऐक्याचे दर्शन जाणारे ठरले. ते दृश्य होते गंजमाळ येथील पंचशीलनगरमध्ये एका इमारतीच्या टेरेसवर हिंदू- मुस्लिम मित्र दोघे एकत्र पतंग उडवताना दिसून आले.

विशेष म्हणजे कधी मुस्लिम मित्राच्या हातात पतंग, तर हिंदू मित्राच्या हाती मांजाची फिरकी, तर कधी हिंदू मित्राच्या हाती पतंग आणि मुस्लिम मित्राच्या हाती फिरकी असे आलटून पालटून दोघेही मित्र पतंग उडवण्याचा आनंद घेताना दिसून आले. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम अशा प्रकारचे दृश्य करत आहे.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Ganjmal: Ram-Rahim couple enjoying flying kites on the terrace of a building in Panchsheelnagar
Makar Sankranti 2023 : संक्रातीच्या पार्श्वभूमीवर मोहोळची बाजारपेठ गजबजली महिलांची खरेदीसाठी झुंबड

सण-उत्सव, खेळात नाही सीमा

दिवाळी, रमजान ईद, संक्रांत अशा विविध प्रकारच्या सणांमध्ये हिंदू- मुस्लिम बांधव एकत्र येतात. मोठ्या गुण्यागोविंदाने सण साजरे करत एकमेकांना शुभेच्छा देत असतात. सणानिमित्त एकमेकांच्या घरी पाहुणचार घेत सामाजिक धार्मिक एकतेचे दर्शन घडवत असतात. मंकरसंक्रांतीनिमित्तही पतंग उडवणे, एकमेकांच्या घरी पाहुणचार घेणे असे चित्र दिसले. तर दुसरीकडे पतंग खरेदी विक्री करणाऱ्या दुकानदारांमध्येदेखील ५० टक्के मुस्लिम बांधव दुकानदार असल्याचे आढळून आले.

Ganjmal: Ram-Rahim couple enjoying flying kites on the terrace of a building in Panchsheelnagar
Makar Sankranti : मकर संक्रांती निमित्त काढा अशा रांगोळ्या; घरात येईल सकारात्मकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.