Nashik News : लव्ह जिहाद विरोधात त्रंबकेश्वरमध्ये हिंदू संघटना आक्रमक!

Hindu Organization Morcha
Hindu Organization Morcha esakal
Updated on

नाशिक : श्रद्धा वालावलकर प्रकरण विरोधात म्हणजेच लव्ह जिहाद प्रकरण विरोधात त्रंबकेश्वर येथे आज हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने विराट मोर्चातून काढण्यात आला. (Hindu organization aggressive against Love Jihad in Trimbakeshwar Nashik Latest Marathi News)

हिंदुच्या मुलिंना प्रेम प्रकरणात फसवून त्यांच्या हत्या करणे अथवा विविध प्रकारचे त्रास देणे. या मुळे मुली घाबरतात किंवा फसव्या जाळ्यात अडकतात. ह्या विरोधात सकाळी त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरालगत च्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ त्रंबकेश्वर तालुका व शहरातील सर्व हिंदू प्रेमी नागरीकांनी प्रार्थना केली.

या वेळी आनंद आखाड्याचे महंत शंकराने सरस्वती, रघुनाथ महाराज उर्फ फरशीवाले महाराज, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सुरेश गंगापुत्र, भुषण अडसरे, वारुणसे बंधु, यांच्यासह त्रंबकेश्वर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य, त्रंबकेश्वर देवस्थान चे विश्वस्त, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यासह शहरातील युवती, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

Hindu Organization Morcha
Sanjay Raut Nashik Daura : क्रिकेट, भेटीगाठी, बैठका अन् बरच काही...

हा मोर्चा छ. शिवाजी चौकातून पातळी, तेली गल्ली मार्गे बस स्थानकापासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर नेण्यात आला. तेथे आत्ताच्या लव्ह जिहाद बाबतीत उपस्थिती पैकी काही मान्यवरांनी आपले विचार प्रगट केले.

*मोर्च्यातील सहभागी असणाऱ्या सर्वांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या.

आजच्या मोर्चा सर्वपक्षीय समावेशक असल्याने संख्या मोठी होती. या मोर्चात छ. शिवाजी व संभाजी महाराज यांच्या जयघोष करीत तर लव्ह जिहाद विरोधात घोषणा देण्यात येत होत्या. युवक, युवती हातात निषेधाचे फलक घेऊन सहभागी झाले होते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक रणदिवे व त्यांच्या समवेत जादा पोलिस कुमक या मोर्च्या प्रसंगी ठेवण्यात आली होती.

Hindu Organization Morcha
Nashik Crime News : शहरात अडीच लाखांच्या घरफोड्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.