श्रावणातही 'देऊळ बंद'; हिंदुत्ववादी संघटना, देवस्थानांचा आक्रमक पवित्रा

kalaram mandir 123.jpg
kalaram mandir 123.jpgGoogle
Updated on

पंचवटी (नाशिक) : येत्या सोमवारपासून (ता.९) श्रावण मासारंभ सुरू होत आहे, मात्र कोरोना संभाव्य तिसऱ्या लाटेचा धसका घेऊन राज्य शासनाने श्रावणातही ‘देऊळबंदी’ चा निर्णय कायम ठेवला आहे. याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांसह विविध देवस्थानांनी आक्रमक पवित्रा घेत मंदिरांची दारे उघडण्यासाठी संबंधित यंत्रणेला साकडे घातले आहे.

कोरोना दुसऱ्या टप्प्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धास्तीने व देवस्थानांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे सलग दुसऱ्या वर्षीही देवस्थाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासन एकीकडे व्यावसायिकांना पूर्णवेळ व्यवसायाला परवानगी देत आहे, दुसरीकडे लाखो हिंदू धर्मीयांची श्रद्धास्थाने असलेल्या मंदिरे अद्यापही बंदच असल्याकडे लक्ष वेधत हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिराची दारे खुली करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. यासाठी तमिळनाडू व इतर राज्यांची उदाहरणे दिली जात आहेत.

मंदिर बंद असल्याने बारा बलुतेदार वर्गाची उपासमार होत असल्याकडे अनेकांनी लक्ष वेधले आहे. दुसरीकडे मंदिरे उघडलीच पाहिजे, परंतु त्यासाठी परिस्थितीही लक्षात घेण्याचे आवाहन काही ट्रस्टींनी केले आहे. हिंदू धर्मीयांना एक न्याय व अन्य धर्मीयांना दुसरा न्याय, हे कुठवर चालणार, असा प्रश्‍न काहीही उपस्थित केला आहे.

kalaram mandir 123.jpg
नाशिक मनपा राबविणार स्मार्ट स्कूल योजना

मंदिरे ही कोट्यवधी हिंदू धर्मीयांची श्रद्धास्थाने असून, येथे अनेकांना ऊर्जा मिळते. श्रावण महिना व्रत वैकल्याचा आहे. आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने देवस्थाने खुली करण्यास परवानगी द्यावी.

- सतीश शुक्ल, अध्यक्ष, श्री गंगा गोदावरी पुरोहित संघ

देवदर्शनासाठी मंदिरे उघडावीत, ही मागणी भाविक म्हणून ठीक आहे. परंतु, त्याचबरोबरच निर्माण झालेली परिस्थितीही विचारात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत शासनाचा निर्णय सर्वांनी मान्य करायला हवा.

- ॲड. भाऊसाहेब गंभिरे, विश्‍वस्त, श्री कपालेश्‍वर महादेव मंदिर ट्रस्ट

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदू धर्मियांत आलेले नैराश्‍य दूर करण्यासाठी मंदिराची दारे उघडणे गरजेचे आहेच, त्याचबरोबर थांबलेल्या धार्मिक अर्थकारणासही चालना देणे गरजेचे आहे.

- धनंजय पुजारी, विश्‍वस्त, श्री काळाराम मंदिर देवस्थान ट्रस्ट

कोरोनामुळे अगोदरच अर्थकारण ठप्प झाल्याने हातावर पोट भरणाऱ्या वर्गाचे जगणे अवघड बनले आहे. त्यामुळे देवस्थाने खुली करून काही प्रमाणात अर्थकारणासही बूस्ट मिळू शकेल.

- महंत कवींद्र गोसावी, विश्‍वस्त, श्री सीतागुंफा देवस्थान ट्रस्ट

हिंदुत्ववादी असलेल्या कै. बाळासाहेब ठाकरे यांचे पूत्र व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आघाडी सरकारमुळे सेक्युलर झाले आहेत. मंदिरातून फूल विक्रेते, तेल विक्रेते, प्रसादाची दुकानदार यांना रोजगार मिळतो, परंतु योग्य काळजी घेऊन श्रावण महिन्यात देवस्थाने खुली झालीच पाहिजे.

- रामसिंग बावरी, संस्थापक अध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन पक्ष.

कोरोना संसर्ग आटोक्यात येऊनही मंदिरे बंद ठेवणे चुकीचे आहे. लाखो भाविकांना मंदिरातून शांती, जगण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे श्रावण महिन्यात देवस्थाने खुली करावीत.

- महंत भक्तीचरणदास, पंचमुखी हनुमान मंदिर.

kalaram mandir 123.jpg
नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर नऊ प्लेटिंग उद्योग ‘रिस्टार्ट’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()